सावली. भारतीय जनता पार्टी तालुका सावली च्या वतीने राष्ट्नेता ते राष्ट्रपिता दरम्यान सेवा पंधरवडा कार्यक्रम दिनांक २१ सप्टे २०२२ ला कोंडेखल या गावी घेण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य योगिता डबले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जल हे जिवन असून भविष्यात पाण्याचे महत्त्व कीती अनमोल आहे, पाणी हे सजीव, निर्जीव, निसर्गाला , शृष्टीवर्ती सर्व घटकाला आवश्यक आहे जीवनातला महत्त्वाचं घटक असून पाण्याच्या सावर्धना वर संबोधित केले यावेळी या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य योगिता डबले, सरला कोटांगले सरपंच कोंडेखल, नरेश बाबनवाडे उपसरपंच, अतुल ठाकुर शक्ति केंद्र प्रमुख, शामराव घोडे, प्रकाश भोयर, मार्कंडेय शेरकी, राजु घोडे, कैलास चरदे , रिंकी ठाकुर कोमल घोडे, प्रतिक्षा चुढरी, छबू ठाकुर व गावातील महिला, पुरुष, नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते