कारंजा (लाड) : दैनिक देशोन्नती कारंजा शहर प्रतिनिधी म्हणून नव्याने कारंजा येथील गो ग्रिन फाऊंडेशन कारंजाचे सक्रिय सदस्य,विश्वप्रयाग कॉम्प्युटर्सचे संचालक,राजकिय व सामाजिक क्षेत्राशी जुळलेले युवा कार्यकर्ते, गोपाल पाटील कडू यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल,महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषद वाशिम तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा कडून त्यांचे अभिनंदन करण्याकरीता आणि भविष्यातील यशस्वी वाटचालीकरीता त्यांना शुभेच्छा देण्याकरीता संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे तथा उपाध्यक्ष उमेश अनासाने यांनी स्थानिक टिळक चौक,रेणुका लॉन स्थित विश्वप्रयाग कॉम्प्युटर्स येथे जाऊन गोपाल पाटील कडू यांची सदिच्छा भेट घेतली.व त्यांना महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषद,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा साप्ताहिक करंजमहात्म्य,दैनिक विश्वजगत,युवाक्रांती समाचार कडून शुभेच्छा दिल्या व सर्वोतोपरी सहकार्याबद्दल त्यांना आश्वासित केले.यावेळी आपल्या अभिनंदनाला उत्तर देतांना गोपाल पाटील कडू यांनी सांगीतले की, "माझ्या वडिलांकडून मी राजकिय व सामाजिक कार्याचे बाळकडू घेतलेले असून,दैनिक देशोन्नती परिवाराने दिलेली जबाबदारी आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडेल याची ग्वाही दिली.