कारंजा [लाड] : "जीवंत माणसांच्या प्राणाचे मोल केव्हाच होऊ शकत नाही." एकदा गेलेले मानवाचे प्राण परत कधीच येऊ शकत नाहीत. त्यामुळे माणसाने केव्हाच हिमंत न हारता आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून स्वतःच्याच इभ्रतीचे आणि मृत्युनंतर स्वतःच्याच मृतदेहाचे सुध्दा, मृत्युनंतर धिंडवडे उडवू नयेत. स्वतः सोबतच, आपल्या परिवाराला- सामाजिक, मानसीक (पोलिस विभाग,कोर्ट कचेरी) आणि आर्थिक अंधःकारात लोटू नये. तुमचेवर खुपच वाईट वेळ आली . कुणा सोबत वैरत्त्व आले. किवा शेतातील नापिकी, नुकसान, तोटा आला. एखाद्या व्यवसायात, नोकरीत, परिवारिक संबध, प्रेमसंबधात सुद्धा अयशस्वी ठरलात तरी देखील, हिमंत ठेऊन १००%जगण्याचाच प्रयत्न केला पाहीजे. नव्हे नव्हे नव्या उमेदीने आयुष्य जगलचं पाहिजे. आधीच दिवसेंदिवस मनुष्य प्राण्याचे आयुष्य कमी कमी होत गेलं. त्यात आपणच आपला प्रतिघात करून घेतला तर जन्मदात्या परमेश्वर, आपले आई वडील, आपले कुटूंब व समाज व्यवस्था यांचेशी आपण प्रतारणा करीत असतो. त्यामुळे आपण चालू जन्मात तर सौख्य प्राप्त करू शकतच नाही. मात्र मृत्युनंतरही आपणास मोक्ष मिळत नाही. व आपला असंतुष्ट आत्मा तडफडतच राहणार असतो. त्यामुळे अपयशावर मात करणे, कितीही नुकसान झालं तरीही ते सहन केलचं पाहिजे. मनुष्य जन्मात सुखं-दुःखं, नफा-नुकसान ह्या नाण्याच्या दोन्ही बाजू कायम असतात. ऋतूचक्राप्रमाणे म्हणा किंवा अगदीच सोप्या भाषेत सांगायच झाल्यास रात्र-दिवस या चक्राप्रमाणे सुखं दुःख येत असतात. जात असतात. आज दररोज वर्तमान पत्र उघडले म्हणजे कोठे स्त्री ची आत्महत्या तर कोठे पुरुषाची आत्महत्या दिसून येते तेव्हा मन सुन्न होते. आणि म्हणून समाज व्यवस्थेतल प्रत्येक मानवाने, दुसऱ्या मानवाला धिर देऊन, हिमंत देऊन, त्याची मन:स्थिती जाणून घेऊन तनमनधनाने मानसिक आधार दिला पाहिजे व आत्महत्येचे विचारही त्याचे मनात कधीच येऊ नये याची दखल घेतली पाहिजे. तुम्ही स्वतःतर जगतच आहात. परंतु इतरांना सुद्धा जगवीले पाहिजे. नव्हे तर दुःखी कष्टी असलेला किंवा मानसिक संतुलन गमविलेला दुसरा व्यक्ती सुद्धा जगवीला पाहिजे. आपल्या स्वभावाने इतरांची मानसिक समजूत निघून त्याला जीवदान मिळाले पाहिजे. असे प्रबोधनात्मक प्रतिपादन, "मानवसेवा परमो धर्मः, विचार मंच कारंजाचे" , महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त, समाजप्रबोधनकार प्रवचनकार- संजय कडोळे यांनी केले आहे.