विश्वबंधुत्व / दिग्विजय दिन
अमेरिकेतील शिकागो शहरात भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी केलेले भाषण हे जगातील सर्वात प्रसिद्ध भाषणांपैकी एक मानले जाते. या भाषणाने जगाला नवी दिशा आणि भारताला नवी ओळख दिली. "अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधुनो" अशी त्यांची सुरूवात होताच उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. स्वामीजींनी आपल्या भाषणातून सहिष्णुता, बंधुता व सर्व समावेशकतेचा संदेश दिला तसेच सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठता आणि धर्मांधतेचा विरोध.
११ सप्टेंबर १८९३ रोजी केलेले हे त्यांचे भाषण
अमेरिकेतील माझ्या बंधुनो आणि भगिनींनो ! आपल्या प्रेमळ व उत्स्फूर्त स्वागताने माझे हृदय हर्षामुळे भरून आले आहे. जगातील सर्वात प्राचीन परंपरेच्या वतीने मी आपले आभार मानतो. सर्व धर्माची जननी असलेल्या, सर्व जाती, पंथांच्या लाखो, करोडो हिंदूंच्या वतीने मी आपणांस मनःपूर्वक धन्यवाद देतो. माझे आभार त्या लोकांसाठी आहे, ज्यांनी या व्यासपीठवरुन म्हटले की, पूर्वेकडील देशांकडून सहिष्णुतेचा विचार जगाला मिळाला आहे. मला अभिमान आहे की, मी अशा धर्मातून आहे, ज्याने जगाला सहिष्णुता व सर्व समावेशकतेचा संदेश दिला. आम्ही केवळ सर्व समावेशकता आणि सहिष्णुतेवरच विश्वासच ठेवतो असे नाही तर जगातील प्रत्येक धर्माचा सत्य म्हणून आम्ही स्वीकार करतो.
मला अभिमान आहे की, मी अशा धर्मातून आहे ज्याने जगाच्या पाठीवरील सर्व देशांतील आणि धर्मातील पीडित व गांजलेल्या लोकांना आश्रय दिला आहे. मला हे सांगताना गर्व वाटतो की, रोमन हल्लेखोरांनी ज्या इस्त्रायलींच्या धर्म स्थळांची तोडफोड केली, त्या सर्वांच्या स्मृती आम्ही आमच्या हृदयात आजही जपून ठेवल्या आहेत. त्या इस्त्रायलींनीही दक्षिण भारतातच आश्रय घेतला होता. महान पारशी धर्माच्या लोकांना शरण देणाऱ्या व आजही त्यांचे पालन-पोषण करणाऱ्या धर्माचा मी एक भाग आहे, याचाही मला सार्थ अभिमान आहे.
बंधूनों ! लहानपणापासून मी ऐकलेल्या एका श्लोकाच्या काही ओळी आपल्याला ऐकवण्याची माझी इच्छा आहे. कोट्यावधी लोक आजही या ओळींचे पारायण करतात. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावून अखेरीस समुद्राला जाऊन मिळतात. त्याचप्रमाणे माणूस आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे मार्ग निवडतो. हे मार्ग सरळ असते की वाकडे-तिकडे, ते शेवटी भगवंतापर्यंतच जातात.
वर्तमान संमेलन आजपर्यंतच्या सर्वात पवित्र सभेपैकी एक आहे. भगवतगीते मधील या सिद्धांताचाच एक प्रमाण आहे, जो माझ्यापर्यंत येतो, तो कसाही असो, मी त्याच्यापर्यंत पोहचतोच. लोकांनी कुठलाही मार्ग निवडला तरी अखेरीस ते माझ्या पर्यंत पोहचताच, सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठता आणि धर्मांधतेने बऱ्याच काळापासून पृथ्वीला हिंसाचाराने भरुन टाकले आहे. कितीतरी देश नष्ट झाले आहेत. जर हे भयानक राक्षस नसते तर मानव समाज आज कितीतरी प्रगत झाला असता. मात्र, आताच्या राक्षसांचे दिवस भरले आहेत. मला विश्वास आहे. आजच्या या परिषदेनंतर सर्व प्रकारची धर्मांधता, सर्व प्रकारच्या वेदना मग त्या तलवारीने झालेल्या असोत की, लेखणीने सर्व माणसांमाणसां मधील सर्व प्रकारच्या दुर्गुणांचा संहार करेल.
लेखक:-
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....