ता.मूर्तिजापूर , जि.अकोला , मुंगशी दि. 28/09/2024 रोजी मुंगशी ला गावपातळीवर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान हे स्वतंत्र व कायमस्वरूपी झालेच पाहिजे !
शासनाकडून राबविण्यात येत असलेले उमेद अभियान हे स्वतंत्र व कायमस्वरूपी विभाग करा. महाराष्ट्र जीवनोत्ती अभियानाला स्वतंत्र व कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता ध्या. त्याकरिता मुंगशी येथे 13 समूहाच्या 130 महिलांच्या समवेत ग्रामस्तरावर पूर्ण गावभर रॅली काढण्यात आली.यामध्ये विशाखा ग्रामसंघाचे पदाधिकारी , ICRP , पशुसखी यांचेकडून प्रतिष्ठित व प्रथम नागरिक सरपंचताई , ग्रामपंचायत सदस्य , गाव पोलीस पाटील , अंगणवाडी सेविका , आशा सेविका , तंटामुक्तीध्यक्ष , रोजगार सेवक , यांना उमेदचा चा विभाग स्वतंत्र झाला पाहिजे याकरिता निवेदन देण्यात आले ! यांच्या उपस्थितीत या रॅली ची सुरुवात ह्या घोषवाक्यांनी करण्यात आली:-
१) सेवेत कायम करा , उमेदचा विभाग स्वतंत्र करा !
२) कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता ध्या !
३) कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करा !
ही घोषवाक्य देऊन रॅली ची सुरुवात केली !
उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्रीयतेने कामकाज सुरू आहे , संपूर्ण महाराष्ट्रातील ८४ लक्ष महिलांची शाश्वत उपजीविका उमेदच्या संस्थेवर निर्भर आहे , व या विविध विषयांवरील संस्थेचे कर्मचारी कॅडर हे अभियान सातत्याने चालवीत आहेत प्रलंबित मागण्यांसाठी ३ वर्षांपासून शासनदरबारी संघर्ष सुरू आहे ! गावस्तरापासून तर राज्यस्तरापर्यंत सर्व कर्मचारी , कॅडर , समूहाच्या महिला धडपडत आहेत.
अशा रीतीने आजच्या या रॅलीमध्ये गावातील समूहाच्या ९०% महिलांचा सहभाग असून , त्यांना कायमस्वरुपी सेवेत घेण्यात आमची मागणी आहे , या रॅलीमध्ये ग्रामसंघाचे सर्व कॅडर जयाताई गवई , वंदनाताई गवई , साधनाताई आठवले आणि १३ ही सामूहाचे सर्व अध्यक्ष , सचिव व सदस्य तसेच ICRP जयमालाताई गवई , पशुसखी उज्वलाताई गवई , ग्रामसंघाच्या लिपिका अर्चनाताई दामले आणि १३० महिलांच्या समवेत रॅली पार पडली !
आपल्या प्रतिक्रिया द्या....