ब्रम्हपुरी ;--जिल्हातील आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांचे जुलै पासूनचे वाढीव मानधन देण्यात यावे,ऑक्टोंबर पासुंन कोरोना भत्ता थकीत आहे ते तातडीने देण्यात यावे.मे 2020 पासून आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना ग्राम पंचायत मार्फत मासिक 1000 रू. कोरो ना प्रोत्साहन भत्ता देण्याचा शासन निर्णय आहे या नुसार मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी तसे पत्र दि.11 नोव्हेंबर रोजी सर्व गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक ,सरपंच यांना लेखी आदेश दिले आहे तरी त्याची आता पर्यंत अमलबजावनी झाली नाही या शिवाय प्रशासन आशा वर्कर वर अनेक कामाचा मोबदला मिळत नाही तरीपण काम करण्यासाठी दबाव टाकत आहेत याला विरोध करण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या ईतर प्रलंबित मागण्या वर चर्चा करण्यासाठी ब्रम्हपुरी येथील आयटक कार्यालयात जोत्सना ठोंबरे यांच्या अधक्षतेखाली तर प्रमुख मार्गदर्शक आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटनेचे राज्य उपाधक्ष कॉ.विनोद झोडगे,दैनिक सकाळ चे पत्रकार राहुल मैंद यांच्या उपस्थितीत तालुका मेळावा आयोजित केला होता.यावेळी व्यासपीठावर आयटक चे संघटक विलास प्रधान, तालुका सचिव वर्षा घुमे, छाया बोदेले, अंजुषा डवरे, अल्का जिभकाटे, प्रतीक्षा पांडे ,हिरकण्या सोनुले, करुणा चाहांदे,गीता कोटगले,उषा नंद नवार उपस्थित होत्या .
यामध्ये प्रामुख्याने सर्व आशा वर्कर व गट प्रवर्तक यांच्यावर सातत्याने होणाऱ्या अन्यायविरुद्ध अनेक आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांनी आपले विचार व्यक्त केले तसेच संघटनेची नवीन तालुका कार्यकारणी करून अधक्ष पदी ज्योत्स्ना ठोंबरे तर सचिव पदी वर्षा घुमे यांची नियुक्ती करण्यात आली.कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना किमान वेतन देण्यात यावे,त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा,वयाच्या 60 वर्षा नंतर मासिक दहा हजार रुपये पेन्शन लागू करण्यात यावी,कपात करण्यात आलेले कामगार कायदे पूर्ववत करण्यात यावे या मागणीसाठी आयटक च्या नेतृत्वात येत्या 28 व 29 मार्च ला देशव्यापी संप आहे त्या निमित्त 29 मार्च 2022 रोजी आझाद बगीचा येथून सकाळी 12 वाजता चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय वर विराट मोर्चा काढणार असल्याचा इशारा आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांनी दिला आहे आणि या संपात जिल्हाभरातील सर्व आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी महिलां सहभागी होणार आहेत.दैनिक सकाळ चे पत्रकार राहुल मैंद यांनी सुद्धा आशा वर्कर व गट प्रवर्तक यांच्या कामाचे कौतुक करत आपल्या हक्कासाठी संघटना मजबूत करत तीव्र संघर्ष करण्यासाठी सज व्हा! असे आवाहन केले.
सदर मेळाव्यात तालुक्यातील शेकडो आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होत्या.मेळाव्याचे संचालन वर्षा घुमे तर आभार छाया बो देले यांनी मानले.