कारंजा लाड (अशोकराव उपाध्ये) : जैन काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कारंजा शहरात परम पूज्य बुन्देलखण्ड के आदर्शरत्न, विमलकीर्ति, न्याय केशरी, वात्सल्य दिवाकर, राष्ट्रसंत, भारत गौरव, गणाचार्य श्री १०८ विराग सागरजी महाराज ससंघ 35 पिच्छी यांचा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे भव्यदिव्य पंचकल्याणक महामहोत्सव संपन्न करुन या विशाल संघाचा मंगल विहार हिंगणघाट, वर्धानंतर ,मुक्तागिरी येथुन विशाल संघाचा शुक्रवारी दि १४ जुन रोजी 5 वाजता झांशी राणी चौक बायपास येथे आचार्यश्री संघाचे मंगल आगमन होणार आहे. या संघाचे सकल जैन समाज बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी बँड-बाजा व लेझीम पथक, गुरुदेवांच्या जयघोषात या विशाल संघाचे भव्य स्वागत करुन पोहा वेश मार्गे नेवीपुरा ,रामासावजी चौक ,भगवान महाविर चौक या ठिकाणी मंगल प्रवेश होऊन, येथील दि जैन मंदिर येथे संघ वास्तव्यास राहणार आहे. कारंजा च्या इतिहासात दीक्षा समारोह प्रथमच होणार आहे.
दि १४ जुन ते १६ जुन भव्य जैन दीक्षा समारोह चे आयोजन गुरू देवेंद्रकीर्ती सभागृह येथे करण्यात आले आहे. दि १४ जुन रोजी मेहंदी विधी,हळद विधी, दि १५ जून ला सकाळी दीक्षार्थी आहार विधी,दुपारी १ वाजता गणाधरवलय, विधान सायकाळी 5 वाजता मिरवणूक , रात्री ८ वाजता गोद भराई ,भजन संध्या ,दि १६ जून ला सकाळी ४ वाजता केश लोच सकाळी ५ वाजता मंगल स्नान ,सकाळी ७ वाजता दीक्षा संस्कार विधी चे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व समारोह करिता संपूर्ण भारतातून लोक येणार आहे
तरी सकल दिगंबर जैन समाज बांधवांनी या कार्यक्रमा करिता उपस्थिती द्यावी असे आवाहन सकल दि जैन समाज व मुनीसेवा समिती कारंजा (लाड) द्वारे करण्यात आले आहे. दीक्षाविधीचा कार्यक्रम संपन्न करून आचार्य श्रींचा संघ पुसेगाव येथील सर्वज्ञ तीर्थ येथील पंचकल्यानाकरिता जाणार आहे. या सर्वज्ञ तीर्थाची निर्मिती परमपूज्य विशेष सागर जी महाराज यांच्या प्रेरणेतून झाली आहे. एवढ्या मोठ्या विशाल संघाचे महाराष्ट्रात आगमना करिता विशेष सागर महाराजांचे विशेष प्रयत्न आहेत.असे वृत्त आमचे प्रतिनिधी अशोकराव उपाध्ये यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....