प्रतिनिधी ब्रम्हपुरी : सकारात्मक पत्रकारीतेसाठी स्थापन करण्यात आलेल्या व्हाईस ऑफ मीडियाची चंद्रपूर जिल्हा कार्यकारीणी १९ एप्रिलला जाहीर करण्यात आली. यात व्हॉइस ऑफ मीडियाच्या डिजिटल विभागाच्या ब्रम्हपुरीच्या अध्यक्षपदी ब्रम्हवार्ताचे कार्यकारी संपादक व दैनिक महासागरचे शहर प्रतिनिधी विनोद चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, व्हाईस ऑफ मीडिया डिजीटल विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांचे अनुमतीने जिल्हा कार्यकारणी व तालुका अध्यक्ष कार्यकारीणी डिजीटल विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय सिध्दावार यांनी जाहीर केली आहे. विनोद चौधरी यांची व्हॉइस ऑफ मीडियाच्या ब्रम्हपुरी तालुक्याच्या डिजिटल विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.