चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील एका खासगी आश्रम शाळेतील अधीक्षकांने चाकूच्या धाकावर आठव्या वर्गाचे शिक्षण घेणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून पेशालाच काळामा फासला. हे धक्कादायक प्रकरण हिंगणघाट पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर रविवारी उघडकीस आले.
या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी आरोपी आश्रम शाळेतील अधीक्षक संजय एकनाथ इटनकर (53) याच्या विरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पण घटनास्थळ भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याचे हे प्रकरण पुढील तपासासाठी भद्रावती पोलिसांकडे वळते करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पीडितेचे आई-वडिल चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून ते दोघेही दोन महिन्यांपूर्वी हिंगणघाट येथे रहायला आलेत. मुलीची प्रकृती बिघल्याची माहिती मिळाल्यावर पीडितेचे वडिलांनी आश्रम शाळा गाठली. शिवाय मुलीला हिंगणघाट येथे आणले. त्यानंतर मुलीच्या पोटाखाली दुखत असल्याचे तिने शेजारील महिलेला सांगिल्यावर धक्कादायक प्रकार पुढे आला.
मुलीला चांगले शिक्षण मिळावे या हेतूने पीडितेच्या आई-वडिलांनी तिला चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील एका खासगी आश्रम शाळेत 7 जुलै रोजी टाकले. पण हिंगणघाट येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या पीडितेच्या वडिलांना 4 ऑगस्टला तुमच्या मुलीची प्रकृती खराब आहे तिला व तिचा शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही घेऊन जा असे शाळेतून सांगण्यात आले. पण सततच्या पावसामुळे पीडितेचे वडील आश्रम शाळेत थोडे उशीराच पोहोचले. मुलीला सोबत घेऊन हिंगणघाटला परतल्यावर 13 वर्षीय मुलीवर 53 वर्षीय अधीक्षकांने लैंगिक अत्याचार केल्याचे पुढे आले.