शासकीय व निमशासकीय अधिकारी तथा कर्मचारी वर्ग दिवसभर कामांमध्ये व्यस्त असतात त्यामुळे त्यांच्यावर ताण येतो. या ताण तणावातून मुक्तता व उसंत मिळावी तसेच आरोग्य सुदृढ राहावे.या उदात्त हेतूने ब्रह्मपुरी प्रेस क्रिकेट क्लबच्या वतीने भव्य रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन देलणवाडी रोड न्यू सावजी ढाबा, चिल आऊट बार समोरील मोकळ्या पटांगणात करण्यात आले. सोहळ्याचे उद्घाटन माननीय विलास विखार गटनेता तथा बांधकाम सभापती नगर परिषद ब्रह्मपुरी , कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चिमूरकर माजी जि. प. सदस्य त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून कांचन तिडके ,मनोज वठे नगरसेवक न. प.ब्रम्हपुरी, डॉ. भारत गणवीर ,अमित मेंढुले ,भूषण रामटेके, नितीन झाडे आगार व्यवस्थापक, शफाकत सैय्यद, नितीन येनुरकर पत्रकार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक प्रशांत डांगे तर आभार प्रदर्शन दत्तायत्र दलाल यांनी केले.
ब्रम्हपुरीत पत्रकार प्रवीण मेश्राम, दत्तात्रय दलाल ,अनुप पानतावणे,प्रशांत डांगे, क्रीष्णा वैद्य,रवी चामलवार, लेकराम डेगे यांनी ब्रम्हपुरी प्रेस क्रिकेट क्लब स्थापून कर्मचारी वर्गासाठी रात्रकालीन हाप पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. पहिल्यांदाच तालुक्यातील पत्रकार मंडळी तर्फे स्तुत्य उपक्रम राबविला याचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले.भविष्यात असेच सामाजिक उपक्रम करावे असा सहकार्यवजा आशावाद उपस्थित मान्यवारांनी व्यक्त केला. सदर हाप पीच क्रिकेट स्पर्धेकरिता प्रत्येक विभागातील कर्मचारी वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून एकूण २४ चमू सामने खेळणार आहेत.आयोजकांतर्फे मनमोहक मैदान, डी. जे. धमाका, रंगबिरंगी जाहिरात फलक उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच उत्कृष्ट संघ व खेळाडूंना मोठ्या रकमेचे बक्षीस व आकर्षक ट्रॉफी सुद्धा देण्यात येणार आहे. सहा दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या उदघाटणीय क्षणाला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत क्रिकेट पाहण्यास चांगलीच गर्दी केल्याचे दिसून आले.