वाशिम : सध्या बंगालच्या उपसागरातील तिव्र अशा कमी दाबाच्या स्थितीमुळे राज्यात वादळी परिस्थिती उद्भल्याचे त्याचाच परिणाम म्हणून मान्सून अधिकाधिक सक्रिय झाला आहे. या परिस्थितीमुळे यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास राज्यातून दि. 15 ऑक्टोबर पर्यंत लांबलेला आहे. या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार,साप्ताहिक करंजमहात्म्यचे मुख्य संपादक तथा महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेशी भ्रमणध्वनीवर बोलतांना जिल्ह्याचे सुपूत्र असलेले हवामान अभ्यासक गोपाल पाटील गावंडे यांनी सांगितले की,येत्या काही दिवसात पश्चिम महाराष्ट्रात तिव्र मुसळधार पाऊस होण्याची चिन्हे दिसत आहेत.शिवाय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह आपल्या वाशिम यवतमाळ जिल्हात दि. 08 सप्टेंबर 2024 ते 12 सप्टेंबर 2024 पर्यंत दमदार पाऊस होऊ शकतो. त्यानंतर दि. 13 सप्टेंबर 2024 ते 19 सप्टेंबर 2024 पर्यंत पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. मात्र काही ठिकाणी रिमझिम पाऊस होऊस होऊ शकतो. तर त्यानंतर परत दि . 20 सप्टेंबर 2024 ते 25 सप्टेंबर 2024 या तारखांना पाऊस होईल. दि 26 सप्टेंबर ते 07 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उघाड राहील. तर दि. 28 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2024 रोजी रात्रीला पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढील महिन्यात दि. 08 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोबर 2024 रोजी रिमझिम ते चांगला पाऊस होईल. दि.11 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोंबर पाऊस होणार नाही.अशी हवामानाची माहिती हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी दिली असून ह्या परतीच्या दिवसात, ढगांचे प्रचंड गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्यास सांगीतलेले आहे. विजा पासून आपला बचाव करण्यासाठी, सायंकाळ होण्या पूर्वी शेतातून घरी यावे. हिरव्या झाडाखाली थांबू नये.तसेच पांधन रस्ते,नदी नाल्यांना पूर असल्यास पुरामधून जावू नये. किंवा आपली गुरेढोरे, चारचाकी किंवा दुचाकी वाहने नेऊ नये. विजेची उपकरणे, रेडीओ, मोबाईल बंद करून ठेवावे.अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.