संत तुकाराम महाराज यांनी श्रद्धा भक्ती संस्कार सोबत अध्यात्म वारकरी संप्रदाय भागवत धर्म याचा प्रचार प्रसार करून समाजाला दिशादर्शक कार्य केल्याचे प्रतिपादन भाजपा महा जिल्हा सरचिटणीस माधव मानकर यांनी केले.
भाजपा कार्यालयात खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले आमदार वसंत खंडेलवाल महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात भाजपा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
संत तुकाराम महाराजांनी अनेक कठीण परिस्थितीमध्ये बहुजन समाजाला दिशादर्शनासाठी काव्याचे माध्यमातून तुकाराम गाथेच्या माध्यमातून भक्ती श्रद्धा संस्कारासोबत वारकरी संप्रदाय व संस्कृतीचा योग्य तो मार्गदर्शन करून जीवनामध्ये कशाप्रकारे जगावे याचे उत्तम उदाहरण त्यांनी दिले आहे अशीही यावेळी माधव मानकर म्हणाले. कार्यक्रमातरमेश खोबरे, अभिमन्यू नळकांडे, अमोल राऊत, योगेश ढोरे, नरेश
फुरंगे ,प्रमोद पोहरे सहज मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भाजप कार्यालयात संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तुकाराम गाथा ग्रंथाची पूजन करण्यात आले.