अकोला - स्थानिक मोठी उमरी येथील रहिवाशी स्व. अंजनाबाई लाजूरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे नातू प्रथमेश लाजूरकर व आर्कि. प्रतीक लाजूरकर यांनी अनाथ मुलींच्या आनंद आश्रमाला आज 31हजाराची देणगी आश्रमच्या स्थानिक संचालिका श्रीमती अनंत तपुपुरा यांना धनादेशाद्वारे प्रदान केली. यावेळी स्व. अंजनाबाई यांचे सुपुत्र प्रमोद लाजूरकर, पत्रकार संजय खांडेकर हे उपस्थित होते. वृद्धापकाळास्तव अंजनाबाई लाजूरकर यांचे नुकताच 5 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले आहे.