कारंजा (प्रतिनिधी) –
राज्य सरकारकडून आणण्यात आलेल्या सुरक्षा विधेयकाविरोधात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कारंजा येथे तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या विधेयकामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, वैयक्तिक स्वातंत्र्यावर व शांततेत आंदोलन करण्याच्या लोकशाही हक्कांवर गदा येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. या कायद्याचा गैरवापर करून सामान्य नागरिक, कार्यकर्ते व पत्रकार यांना लक्ष्य करण्याची शक्यता असल्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला.
लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या या विधेयकाचा निषेध करण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शांततामय आंदोलन हाती घेतल्याचे सांगण्यात आले. आमचे आंदोलन पूर्णपणे अहिंसक, शांततेचे व कायद्याच्या चौकटीत राहील, असेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना खालील पदाधिकारी व कार्यकर्ते दिलीप पाटील रोकडे, तालुका अध्यक्ष ओबीसी सुमित पाटील,युवक जिल्हाध्यक्ष भुजंगराव वाकळे,जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक सेल श्रीधर पाटील कानकिरड जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष
,ज्योतीताई गणेशपुरे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वाशिम,डॉ. अशोक मुंदे ,अजय पाटील रंगे,किरण पाटील ठाकरे,रोशन पाटील वाकळे,शुभम वाकळे,विनोद वाकळे,मनोज खाडे,चंद्रकांत पाटील, नितीन पाटील गाडगे,अमोल तायडे,युवराज पाटील किरण पाटील ठाकरे किरण पाटील ठाकरे तुळशीराम तायडे संकेत नाकले दिनेश वाडेकर शुभम बोनकेअजय राठोड कार्यकर्त्यांनी सह्या केल्या.
या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात दाखल झाले होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....