कोणतीही पूर्व सूचना न देता स्ट्रीट लाईटचे विज कनेक्शन खंडित करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सरपंच संघटना आरमोरी येथील पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन आरमोरी येथे गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन दिला.
आरमोरी तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायतचे ट्रीट लाईटचे विज कनेक्शन खंडित करण्याअगोदर ग्रामपंचायतींना कोणतीही पुर्वसुचना न देता विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विज पुरवठा खंडीत केलेला आहे. यामुळे गावात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेला आहे.आरमोरी तालुक्यात वाघाची दहशत असुन काही दिवसात पावसाळ्याचे आगमन होत आहे यामुळे अंधारात गावातील लोकांच्या जिवीतास काही कमी जास्त झाल्यास याला सर्वस्व जबाबदार एम .एस.इ.बी.चे बेजबाबदार अधिकारी राहतील असे निवेदनात नमूद करून त्या बेजबाबदार अधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावे असे निवेदन नमूद केलेले आहे.निवेदन देतांना संघटनेचे अध्यक्ष संदीप ठाकूर, तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच व सरपंच संघटना आरमोरी येथील पदाधिकारी उपस्थित होते.