कारंजा (लाड) (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) महाराष्ट्र शासनाने सन २०२३ करीता जाहीर करण्यात आलेल्या,सार्वजनिक सुट्ट्यांमधील बकरी ईद ची सार्वजनिक सुट्टी बुधवार,दि. २८.०६.२०२३ रोजी दर्शविण्यात आलेली होती. परंतु सदर बकरी ईद गुरुवार, दि.२९.०६.२०२३ रोजी येत असल्याने,शासनाने सुटीच्या यादीत फेरबदल करून, दि.२८.०६.२०२३ रोजीची सुट्टी रद्द करुन गुरुवार, दि.२९.०६.२०२३ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केलेली असल्याचे वृत्त,महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला मिळाले आहे.