कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): विस्तार सेवा मंडल, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक व बालरंगभूमी परिषद,शाखा - नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने, आंतरशालेय संस्कृत बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा प्राथमिक व अंतिम फेरी या दोन स्तरात आयोजित करण्यात येईल.या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असेल.स्पर्धेतील विजयी चमूस प्रथम,व्दितीय व तृतीय पारितोषिक व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येईल.बालक व बालिका यांना उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक व अभिनयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.याशिवाय दिग्दर्शन,संगीत,प्रकाशयोजना, नेपथ्य,रंगभूषा व वेशभूषा यासाठी स्वतंत्र पारितोषिक देण्यात येईल.सहभागी होणाऱ्या सर्व शाळा / स्पर्धकांना व तांत्रिक सहकार्य करणाऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
या स्पर्धेची प्राथमिक फेरी १ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट २०२३ रोजी जील्ह्या चे ठिकाणी घेण्यात येईल व अंतिम फेरी २८ व २९ ऑगस्ट २०२३ रोज नागपूर येथील प्रसिद्ध सभागृहात घेण्यात येणार आहे,या स्पर्धे मध्ये सहभागी होण्यासाठी ५ जुलै २०२३ पर्यंत कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन अखिल भारतिय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ मुंबईचे सदस्य नंदकिशोर कव्हळकर यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवीले आहे.