कारंजा : -
स्थानिक सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या,आदर्श जय भारत सेवाभावी संस्था कोळी कारंजाच्या वतीने, उद्या मंगळवार दि. ०७ मार्च रोजी, श्रीक्षेत्र चवर्या महादेव संस्थान शेलूवाडा येथे, होळी-शिमगा, धुळवड,रंगपंचमी निमित्त समाजामध्ये सकारात्मक संदेश देण्याच्या उद्देशाने डॉ ज्ञानेश्वर गरड यांच्या पुढाकारातून,आपला मानवी आहार ! शाकाहार !! दुव्यर्सनांचा करू धिक्कार !! हा सुविचार देत,धुळवडीला एकमेकांवर चिखलफेक न करता,पर्यावरणाविषयी व आपल्या आरोग्याविषयी जनजागृती करीत,सुदृढ आरोग्याकरीता विनोद,भजन, गीत-संगीत,काव्य किती महत्वाचे आहे.हे पटवून देत, होळी निमित्ताने सुविचार संमेलन रंग संगीत महोत्सवाचे आयोजन केले आहे. सदरहू कार्यक्रमाचे प्रायोजक : साप्ताहिक करंजमहात्म्य परिवार कारंजा हे असून सदर्हू कार्यक्रमात हिंदी कवी व्यसनमुक्ती प्रचारक दिलीपजी गिल्डा, इचूकाटा फेम विनोदी कवी गोपाल खाडे गुरुजी, गौराई फेम कविवर्य ओंकार मलवळकर, कावनंदिनी, कामाक्षिणी फेम महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त कवी संजय कडोळे, आदर्श जय भारत संगीत परिवाराचे गायक मंडळी डॉ ज्ञानेश्वर गरड, नंदकिशोर कव्हळकर, सुनिल डाखोरे, पांडूरंग माने, मोहित जोहरापूरकर, प्रदिप वानखडे, गोपिनाथ डेंडूळे, डॉ.स्नेहल राऊळ, डॉ.आशिष सावजी, शिवाजीराव गायकवाड, रामबकस डेंडूळे, देविदास नांदेकर, सुनिल गुंठेवार, रोमिल लाठीया, विजय राठोड, दादाराव सोनिवाळ, विलास ठाकरे, उमेश अनासाने, भगवान खेमवानी, कैलास हांडे इत्यादी मंडळी कार्यक्रम सादर करणार आहेत . तरी पंचक्रोशितील गावकरी मंडळीनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजका कडून करण्यात आले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....