दारू तस्कर आणि पोलिसांच्या शहराच्या गल्लीबोळातून होणारा पाठलाग शहरातील शिवाजी वॉर्डवासीयांनी रात्रीच्या वेळी अनुभवला. पकडला जाईल अशी परिस्थिती असतांना दारू तस्कर पसार होण्यात यशस्वी झाले. पोलिस अशा प्रकारेच दारू तस्करांचा पाठलाग करीत असतात शहरवासीयांना आला. याचा प्रत्यय रात्री १० च्या सुमारास दुचाकीने दोन इसम समोर दारूची पेटी घेउन जाताना पोलिस उपनिरीक्षक असलेले युसूफ ईनामदार यांना दिसले. ईनामदार हे आपल्या बुलेट या दुचाकीने आले होते. खुलेआम दारूतस्करी करीत असल्याचे आढळून आल्यावर त्यांनी दारू तस्करांचा पाठलाग सुरू केला. मात्र तस्कर शिवाजी वॉर्डातील लक्ष्मीनारायण मंदिर परिसराच्या लहान लहान गल्ल्यातून घुसले. त्यांचा पाठलाग करीत असताना ईनामदार देखीलआपल्या दुचाकीने भरधाव वेगाने त्यांचा पाठलाग करत दारू तस्करांच्या नाकात दम आणले. मात्र या परिसरातील रस्ते फार अरुंद असल्याने मोठी कसरत करून ईनामदार यांना दुचाकी चालवावी लागली. अशाही परिस्थितीत त्यानी दारू तस्करांचा पाठलाग केला. दारू तस्कर देखील जीवाची पर्वा न करता दुचाकी चालवित होता. मात्र अर्धा तासाच्या या पाठलागात कधी या गल्लीतून तर कधी त्या गल्लीतून जात असताना दारू तस्कर पसार झाले.