कारंजा - विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ, नागपूर व झील इंटरनॅशनल स्कूल,कारंजा यांचे संयुक्त विद्यमाने झील इंटरनॅशनल स्कूल, भिलखेडा कारंजा येथे दि.20 डिसेंबर 2025 रोजी वाशिम जिल्हास्तरीय विज्ञान उत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले.
प्रदर्शनीच्या उद्घाटनीय कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून कारंजा तहसीलचे तहसीलदार कुणाल झाल्टे, अध्यक्ष म्हनून वाशिम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सतीन मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून कारंजातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. अजय कांत,विज्ञान भारतीचे समन्वयक नरेंद्र सातफळे, सौ.मनिषा घारे,सतीश घारे, मंजुषा थत्ते,झील इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष शार्दुल मेश्राम,सचिव चेतना मेश्राम, मुख्याध्यापक अभिलाषा बासुळे,वाशिम जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे विजय भड, मनिष गावंडे,प्रभारी विज्ञान पर्यवेक्षक ललित भूरे व विद्याभारती इंग्लिश स्कूलचे माजी प्राचार्य डॉ. रविंद्र मुकवाने, परीक्षक गण आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण गवई,तर स्वागतपर मनोगत काजल पवार यांनी व्यक्त केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सतीन मेश्राम यांनी विज्ञान प्रतिकृती कक्षाची फित कापून विज्ञान प्रकल्प,रांगोळी व पोस्ट प्रदर्शनीचे उद्घाटन केले. तहसीलदार कुणाल झाल्टे उद्घाटनीय भाषणात म्हणाले की,संशोधक वृत्ती वृद्धींगत करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन हा उपक्रम आवश्यक आहे व शालेय जीवनात विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. डॉ. अजय कांत यांनी सहभागी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पोस्टर व विज्ञान प्रकल्प याचे भरभरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात अधिष्ठाता सतीन मेश्राम यांनी आजच्या शिक्षण प्रणालीबाबत मार्गदर्शन करुन मानवी जीवनात विज्ञानाचे महत्व विषद केले.
कार्यक्रमाची सुरवात झील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनीनी समूह गिताने केली.सदर प्रदर्शनीमध्ये 21 प्रतिकृती, 23 रांगोळी,25 पोस्टर, 09 विज्ञान नाटिका चा समावेश या प्रदर्शनीत करण्यात आला होता. सदर प्रदर्शनीला वाशिम जिल्हातील बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षकांनी भेटी दिल्या. उद्घटनीय कार्यक्रमाचेे आभार रेखा कातपुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झील इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्म. व विज्ञान भारतीचे सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.