अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार व भाजपाचे ज्येष्ठ नेते गोवर्धन शर्मा यांची प्रकृती बरी नसल्यामुळे मुंबई येथे त्यांच्यावर उपचार सुरू असून आरोग्य महा शिबिराची माहिती त्यांना मिळाल्याबरोबर त्यांनी आज आमदार रणधीर सावरकर तसेच संयोजक अनुप धोत्रे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून शुभेच्छा व्यक्त केल्या व आरोग्य शिबिर अकोला पंचकोशीसाठी आवश्यक असून रुग्णांची उत्तम व्यवस्था करून या व्यवस्थेमध्ये असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देऊन आपल्या कार्यक्रमास संदर्भात संपूर्ण माहिती घेतली .
मुंबई येथेच त्यांच्या उपचारा सुरू असून त्यांचे जेष्ठ पुत्र कृष्णा शर्मा यांनी त्यांची प्रकृती चांगली होत असून दिवसेंदिवस त्याच्यामध्ये सुधारणा होऊन उपचाराला ते योग्य प्रतिसाद देत असल्याचे सांगून आमदार शर्मा यांच्या प्रकृती बरी होण्यासाठी जिल्ह्यातील व पश्चिम विदर्भातील अनेक भाजप पदाधिकारी विविध सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाचे कार्यकर्ते यांनी शुभेच्छा व्यक्त केले आहे त्यांच्या भावना त्यांची सदिच्छा त्यामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.
आरोग्य शिबीर तसेच संघटना संदर्भात आमदार सावरकर यांच्याशी चर्चा करून आमदार शर्मा यांनी आपली प्रकृती बरी नसताना सुद्धा जनतेविषयी जबाबदारी ओळखून संवेदनशील असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे मानवता धर्माला पाळणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून निर्माण झालेले नेतृत्व आमदार शर्मा सातत्याने समाज क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्यांच्या प्रकृती चांगली व्हावी अशी अनेक कार्यकर्ते हितचिंतक प्रार्थना करत असून त्यामध्ये सुधार होत असल्याचा ही भाजप सूत्रांनी माहिती दिली.