विष प्राशन केल्याने उपचारासाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद पोलिसांनी ९ एप्रिल रोजी घेतली आहे. प्रियंका रूपचंद राऊत (२६, रा. टोयागोंदी, हल्ली मुक्काम मुंगली) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. विष प्राशन केल्यामुळे तिला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले होते; परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याने डॉ. मोहीत थूल यांनी मृत घोषित केले. नवेगावबांध पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.