कारंजा :
सर्वाच्या लाडक्या मित्राच्या प्रदिप वानखडे यांच्या वाढदिवशी,चक्रीवादळ आणि मुसळधार पाऊसाची तमा न बाळगता जमलेल्या मित्रमंडळीनी,आदर्श जय भारत संगीत परिवाराच्या "संगीत-रजनी" कार्यक्रमाद्वारे त्यांचा वाढदिवस अतिशय आनंदोत्साहात साजरा केला.याबाबत अधिक वृत्त असे की,आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या सेवेकरीता समर्पित करणाऱ्या,सेवाव्रती नि:स्वार्थी व हाडाचे काँग्रेस कार्यकर्ते असलेल्या, प्रदिप विनायकराव वानखडे यांचा वाढदिवस मंगळवार दि २५ एप्रिल रोजी असल्याने माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया यांच्या पुढाकाराने,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे (पत्रकार) यांनी स्वतःजातीने लक्ष्य घालीत, त्यांच्या वाढदिवसाचे यशस्वी आयोजन केले होते.सदर्हु कार्यक्रम मंगळवारी दि २५ एप्रिल रोजी सायंकाळी ०७:०० वाजता आयोजीत केलेला होता.परंतु नेमका त्याचवेळी,अचानक सोसाट्याचा वारा,विजांचा लखलखाट,ढगांचा प्रचंड गडगडाट आणि न थांबणारा मुसळधार पाऊस सुरु झाला. व त्यातच विद्युत पुरवठा बंद होऊन सर्वत्र अंधाराचे साम्राज्य सुरु झाले.परंतु त्याही परिस्थितीमध्ये ह्या तळागाळातील काँग्रेस कार्यकर्ता असलेल्या सच्च्चा समाजसेवकाला,प्रदिप विनायकराव वानखडे यांना शुभेच्छा देण्याकरीता त्यांची जिवाभावाची मित्रमंडळी पाऊसाची पर्वा न करता कारंजा शहराच्या कानाकोपर्यातून एकत्र आली.

आणि जणू काही त्यांच्या निःस्वार्थ समाजकार्याची पावतीच मिळाली.याबाबत अधिक वृत्त असे की,प्रदिप वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त,मंगळवारी दि. २५ एप्रिल रोजी, विदर्भ लोककलावंत संघटनेचे उपाध्यक्ष ह.भप.लोमेश पाटील चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सत्कारमूर्ती प्रदिप वानखडे,ईरो फिल्मस् प्रॉडक्शनचे अध्यक्ष डॉ. इम्तियाज लुलानिया,अखिल भारतिय नाट्य परिषद नियामक मंडळ मुंबईचे नवनिर्वाचित सदस्य नंदकिशोर कव्हळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ज्येष्ठ समाजसेविका आणि प्रदिप वानखडे यांच्या मातोश्री श्रीमती सुधाताई वानखडे यांच्या विशेष उपस्थितीत "संगीत-रजनीचा" कार्यक्रम घेण्यात आला.प्रारंभी श्री प्रदिप वानखडे मित्र मंडळातर्फे श्रीमती सुधाताई वानखडे यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येऊन त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. लोमेश पाटील चौधरी व इतर मान्यवरांच्या स्वागत समारंभानंतर, मित्रमंडळातर्फे प्रदिप वानखडे यांचा वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन व ह.भ.प.लोमेश पाटील चौधरी महाराज यांच्याकडून गुरुमाऊली श्री दत्तात्रयाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.तसेच यावेळी वैद्यराज डॉ.इम्तियाज लुलानिया यांचा सुद्धा वाढदिवस असल्याने सत्कार करण्यात आला.आणि नुकत्याच झालेल्या अखिल भारतिय नाट्य परिषद नियामक मंडळाच्या चुरशीच्या निर्णायक निवडणूकीत विजयी झाल्याबद्दल, नंदकिशोर कव्हळ्कर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी झालेल्या संगीत रजनी कार्यक्रमात डॉ ज्ञानेश्वर गरड, इम्तियाज लुलानिया, डॉ आशिष सावजी,अँड संदेश जिंतुरकर, विजय राठोड,गोवर्धनदास कृपलानी,भगवानदास खेमवानी, नंदकिशोर कव्हळकर, भटकर सर,रोमिलसेठ लाठीया,विलास ठाकरे,चव्हाण साहेब इत्यादीनी गीतगायन सादर केले. शुभेच्छाकार्यक्रमाकरीता गोविंदराव मुंदेकर, पप्पूसेठ भट, सुरजितसिंग भाटीया,गीरी गुरुजी, टोपले गुरुजी,उमेश अनासाने,कांचन पाटील चौधरी, राजिक शेख,कडू पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाला विदर्भ लोककलावंत संघटना,ईरो फिल्मस् प्रॉडक्शन ,आदर्श जय भारत सेवाभावी संस्था,नाट्य परिषद व श्री प्रदिप वानखडे मित्र मंडळाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन संजय कडोळे यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....