कारंजा : श्री साईबाबा वाटिका मंदिर बालाजी नगरी भाग-२ कारंजा येथे श्री साईबाबा मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवा दरम्यान सुरु असलेल्या श्रीमदभागवत सप्ताहानिमित्त आयोजीत साईचरित्र प्रवचन करतांना श्री पंचमुखी हनुमान आश्रमाच्या मठाधिश सिद्ध साध्वी महंत भगवत्दास त्यागी श्री श्री १००८ विजयादेवी यांनी हिंदी मराठी भाषेत आपल्या अमृतमय अशा सुमधूर कंठातून श्री साईचरित्र प्रवचन केले.यावेळी त्यांनी सुंदर दाखले देऊन श्री साईचरित्राचे संगीतमय प्रवचन केले.कारंजा येथे प्रथमतःच साध्वी विजयादेवीजीचे आगमन झाले होते.अतिशय तेजस्वी चेहर्याच्या,शांत,हास्यमुख असलेल्या साध्वीजीनी अतिशय शांतचित्ताने मार्मिक आध्यात्मिक असे साईचरित्रावरील संगीतमय प्रवचन जेव्हा केले.
त्यावेळी साई सभागृहामधील सर्व भाविक रसिक श्रोते तन मन धन विसरून शांत चित्ताने ध्यानमग्न होऊन त्यांच्या अवर्णनिय अविस्मरणिय कार्यक्रमाचा लाभ घेत होते. क्षणभराचीही उसंत न घेता साध्वीजींनी सलग दोन तास पर्यंत प्रवचन केले.यावेळी त्यांनी लाडाच्या कारंजा शहराचा विशेष उल्लेख करतांना,श्री गुरुमाऊलीचे कारंजा शहर सदभावनेचे प्रतिक असून ईर्षारहित असल्याचा उल्लेख करतांना,संत महात्म्यांचा संदर्भ जेथे येतो ती ही पवित्रपावन विदर्भ नगरी असल्याचे सांगातले.स्थानिक बालाजी नगरी भाग-२ येथे आता प्रत्यक्ष शिर्डीनिवासी गुरुमाऊली साईबाबा यांचे प्रागट्य होणार असून,त्यांचा कायम निवास राहणार असल्याने बालाजी नगरीत कायमच सुख समाधान राहणार असल्याचे सांगत,साई म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती असून, साईबाबांना गुरुमाऊली मानून त्यांना तुमचे सुख दुःख सांगा.नेहमी सदाचाराने जगा.साईकृपेने तुमच्या जीवनाचे कल्याण होईल असे आशिर्वचन त्यांनी दिले.स्वतः हिंदी भाषिक असलेल्या साध्वीजी श्री श्री १००८ विजयादेवीजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या निस्सिम भक्त असून,श्री गुरुदेव सेवाश्रम गुरुकुंज मोझरी यांच्या आजिवन प्रचारिका सुद्धा आहेत.
त्यामुळे त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजने स्वतः राष्ट्रसंताची खंजेरी वाजवून सादर करतात.त्यांच्या खंजेरी भजनाने कार्यक्रमाला चांगलीच रंगत आल्याचे अनुभवायला मिळाले.कार्यक्रमाच्या प्रारंभी साईबाबा वाटिका मंदिर समितीचे अध्यक्ष किशोर धाकतोड व सहकाऱ्यांनी,साध्वी विजयादेवीजींचा सत्कार केला. साध्वीजीनी साईबाबा वाटिका मंदिर,धाकतोड परिवाराचे आणि विशेष करून या कार्यक्रमाची संधी ज्या पुरस्कारार्थी सज्जनामुळे मिळाली त्या विजय पाटील खंडार, लोमेश पाटील चौधरी, संजय कडोळे यांचा उल्लेख केला.यावेळी बहुसंख्येने महिला पुरुष मंडळींची उपस्थिती लाभली होती.असे प्रत्यक्षदर्शी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.