कारंजा (लाड) : कारंजा नगर पालिका कॉलेनीतील रहिवाशी,नगर पालिकेचे सेवानिवृत्त विद्युत निरीक्षक धर्माजी पांडूरंग वानखडे,यांचे मंगळवार दि. २० मे २०२५ रोजी दुर्धर आजारामुळे दुःखद निधन झाले. धर्माजी वानखडे हे सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिक विचार सरणीचे असून नृसिह सरस्वती स्वामी भजनी मंडळ,लोकमान्य व्यायाम शाळा,लोकमान्य भजनी मंडळात त्यांचा सक्रिय सहभाग होता. मागील काही दिवसांपूर्वी टेलिफोन कॉलनीत श्री विठ्ठल मंदिरात हरिपाठाला जात असतांना कारंजा मुर्तिजापूर मार्गावर अज्ञात मोटार सायकलने त्यांना धडक मारल्याने त्यांना जबरदस्त मार लागून त्यांच्या डोक्याला छातीला व पायाचे गुडघे यांना दुखापत होऊन त्यांची प्रकृती बिघडतच गेली अखेर त्यातच त्यांचा मृत्यु झाला.त्यांचे मागे पत्नी, मुलगी,दोन मुले ईश्वर वानखडे व चि.अमृत वानखडे असा परिवार आहे. खेर्डा काळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रदिप वानखडे यांचे ते काका होते.दि.२० मे २०२५ रोजी बायपास स्थित हिंदु स्मशानभूमीत,नातेवाईक, सगेसोयरे, मित्रमंडळी, नगर पालिकेचे माजी नगरसेवक, कर्मचारी व विविध क्षेत्रातील चाहत्यांच्या उपस्थितीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वांनी त्यांना सामुहिक श्रध्दांजली अर्पण केली.