2 ऑक्टोबर 22 ला डॉ पंजाबराव देशमुख कॉन्व्हेंट व डॉ पंजाबराव देशमुख गर्ल्स ज्यू कॉलेज ब्रम्हपुरी येथे विध्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी भाषण स्पर्धा आयोजित केली होती यामध्ये 45 विध्यार्थी व 15 शिक्षक यांनी आपले विचार व्यक्त केले व गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला.या निमित्य संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा प्रकाश बगमारे यांनी गांधीजी व शास्त्री जी यांचे विचार कायमस्वरूपी प्रेरणा देणारे,चिरकाल टिकणारे आहेत व मानव जातीच्या कल्याण करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत म्हणून सर्वांनी अंगिकरावे असे आवाहन केले .या प्रसंगी संस्था उपाध्यक्ष तथा कॉन्व्हेंट प्राचार्या मनीषाताई बगमारे,कॉलेज प्राचार्या ठाकरे मॅडम,सुपरवायझर निलीमा गुज्जेवार,नंदनवार, शेडमाके, कु पिंकी ठाकरे,कु कुंभारे,कु संयम ,कु कोहळे,कु राऊत,कु जिभकाटे, संजय नागोसे,कामिनी कन्नमवार,घर्षणा सेलोकर व अन्य उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन गोवर्धन दोनाडकर यांनी तर उपस्थित सर्वांचे आभार कु निशा मेश्राम यांनी मानले.