वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी झाल्याची घटना सोमवारला दुपारी दोन वाजता घडली आहे.
जंगलात गुरे चारत असताना अचानक गुराखी सुनील सुधाकर नैताम याच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला केला. मात्र तितक्याच तत्परतेने सुनीलने वाघाशी झुंज देत वाघाला पळवून लावले. यामध्ये तो जखमी झाला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत नवरगाव उपक्षेत्रातील रत्नापूर बिटामध्ये रत्नापूर येथील गुराखी सुनील सुधाकर नैताम (३५) हा नेहमीप्रमाणे सोमवारी रत्नापूर बिटातील कक्ष क्रमांक ४४ मध्ये इतर सहकाऱ्यांसह गुरे चारत असताना अचानक पट्टेदार वाघाने पाठीमागून हल्ला केला.