जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 17 वर्षीय वाघडोह या वाघाचा आज सोमवारी (23 मे) ला सकाळी मृतदेह आढळून आला आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्पात वाघडोह हा सर्वात वयस्क होता.
दोन दिवसांपूर्वी याच वाघडोह वाघाने सिनाळा येथील गुराख्यावर हल्ला करून ठार केले होते. या घटनेपासून या वाघावर ताडोबाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष होते. त्याची प्रकृती ठीक नव्हती, ई माहिती अधिका-यांनी दिली आहे. 17 वर्ष वय असल्याने तो म्हातारा झाला होता. अशातच आज सोमवारी सकाळी त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी वाघाचे काही फोटो व्हायरल झाले होते. हा वाघ वयस्कर असल्याने वन्यप्राण्यांची शिकार करणे त्याला अवघड ठरत होते.
हा वाघ चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्वात मोठा आणि वयस्कर होता. वयस्कर असल्याने त्याला शिकार करणे अशक्य होते. तसेच त्याने सिनाळा गावालगत आपले बस्तान मांडले होते. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघडोह वाघाचा वावर होता. अतिशय म्हातारा आणि अशक्त असलेला वाघडोह माणसं आणि पाळीव जनावरांसाठी धोकादायक ठरू शकतो ही शक्यता लक्षात घेता वनविभाग वाघावर नजर ठेवून होता.