नाली बांधकामावर असलेल्या एका मजुराने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिंधीचक येथे सोमवारी घडली. नागभीड पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. सत्यजित सुशांत मंडल (२४), असे मृतकाचे नाव आहे.
चिंधीचक येथे चिंधीचक ते किटाळी रस्त्याच्या नालीचे बांधकाम सुरु आहे. या कामावर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील काही मजूर कामावर आहेत. हे मजूर चिंधीचक येथे भाड्याचे घर घेऊन राहत आहेत. मृतक सत्यजित दिसून आला. अर्जुनीमोरगाव तालुक्यातील संजयनगर येथील रहिवासी आहे. सोमवारी सकाळी सर्वच कामावर गेले. सत्यजित घरीच होता. कामावर गेलेले मजूर घरी जेवण करण्यासाठी आले. तेव्हा दार लावले होते. आवाज दिला पण दार उघडले नाही. त्यानंतर दार तोडून घरात प्रवेश केला असता सत्यजित घराच्या आड्याला गळफास घेतलेल्या स्थितीत यासंदर्भात पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अधिक तपास ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.