सुवर्ण, रौप्य पदक पटकावून देशाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
सानवी आनंद सोनवणे हिने सातव्या आंतरराष्ट्रीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत आपल्या अद्वितीय कौशल्याने आणि मेहनतीने दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकं जिंकून भारताचे नाव जगभरात उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेचे आयोजन रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया आणि थायलंड यांच्या संयुक्त विद्यमाने थायलंडमध्ये १८ ते २० जून २०२५ दरम्यान केले होते, ज्यामध्ये भारतासह ६ देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला. सानवी, जी भुसावळच्या आंबेडकर नगरमध्ये राहते आणि पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता ६ मध्ये शिकते, हिने तिच्या वयोगटातील थायलंडच्या प्रतिस्पर्ध्यांना आपल्या उत्कृष्ट कामगिरीने मागे टाकत या यशाची गाथा लिहिली.
सानवीच्या यशामागे तिची मेहनत आणि तिचे कोच पीयूष दाभाडे, दीपक सोनार सर आणि तिच्या आई-वडील यांचा फार मोठा हात आहे. तिचे आई ज्योती सोनवणे आणि वडील डॉ. आनंद सोनवणे हे दोघेही उच्च शिक्षित असून, त्यांनी सानवीला तिच्या क्रीडा करिअरमध्ये प्रोत्साहन दिले आहे. सानवी हि भुसावळ चे माजी नगरसेवक श्री लक्ष्मण सोयंके यांची नातं आहे. सानवीच्या यशामुळे भुसावळ शहराचा आणि भारताचा मान वाढला आहे, आणि तिच्या कामगिरीने अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा दिली आहे. तिच्या यशाने हे सिद्ध केले आहे की, योग्य मार्गदर्शन आणि कठोर परिश्रमामुळे कोणतीही गोष्ट साधता येऊ शकते. सानवीच्या या यशामुळे तिच्या कुटुंबासोबतच संपूर्ण भुसावळ शहरात आनंद आणि गर्वाची भावना आहे, आणि तिच्या भविष्यातील यशासाठी सर्वांनी तिच्या पाठीशी राहावे, अशी अपेक्षा आहे.
गेल्या वर्षी सुद्धा राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर सानवी ने 01 सुवर्ण आणि 02 रौप्य पदक घेउन देशाचे नाव मोठे केले होते त्या बदल महाराष्ट्र चे क्रीडा मंत्री श्री दत्तात्रे बारणे, केंद्रीय राज्यमंत्री न्याय आणि श्री रामदास आठवले, तसेच केंद्रीय राज्यमंत्री सहकार आणि नागरी विमान वाहतूक श्री मुरलीधर मोहोळ ह्यनी तिला कौतुक पत्र देऊं तिची पाठ थोपटली होती.