कारंजा (लाड) : सणांचा राजा दिपावली सण म्हणजे स्नेह-श्रध्दा-विश्वास आणि सत्कर्माचे प्रतिक असल्यामुळे मानवाने,मानवता परम धर्म: हे ब्रिद ऊराशी बाळगून परोपकारासाठी जीवन जगले पाहीजे.असे विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी सांगीतले. पुढे बोलतांना त्यांनी सांगीतले,आजचा माणूस हा आजकाल स्वतःच्या स्वार्थाकरीता,स्वतःची धनसंपत्ती आणि केवळ स्वतःचा नावलौकीक वाढविण्याकरीता पूर्णतः माणूसकीहिन होत चाललेला आहे.त्याला स्वतः शिवाय काहीच चांगले दिसत नाही.स्वतःपुढे तो इतरांना तुच्छ लेखत आहे.दुसऱ्याची निंदानालस्ती,टिकाटिप्पणी करून स्वतःला तो स्वतःच सर्वश्रेष्ठ ठरवीत आहे.मात्र या स्वतःच्या स्वार्थाच्या चाकोरीतून माणसाने बाहेर यायला हवे आहे. कारण त्याच्या स्वस्वार्थाच्या लाभामुळे त्याला संपूर्ण समाज किंवा अख्खे जग ओळखून बसलेले असते.त्याच्या स्वार्थी स्वभावाची जगाला चांगलीच पारखं झालेली असते.त्याच्या स्वार्थी आणि हेकेखोर स्वभावामुळे तसेच तो नेहमी नेहमी दुसऱ्या लोकांची करीत असलेल्या त्याच्या निंदानालस्ती,टिका टिप्पणी आणि चुगलखोरीमुळे चांगल्या माणसाच्या नजरेतून कायमचा उतरून जातो.त्याचे स्वभावामुळे दुसऱ्याचे नुकसान न होता ह्या स्वार्थी हेकेखोर व्यक्तीचेच आयुष्य दिवसेंदिवस कमी कमी होत असते.हळूहळू त्याचे आरोग्य ढासळत जाते.मानसिक दृष्ट्या तो कमजोर होतो.भविष्यात त्याला मानसिक-शारिरिक-कौटूंबिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ येते.अशावेळी मग त्याच्या हाकेला प्रत्यक्ष परमेश्वरही धाऊन येत नाही.रक्तदाब मधुमेह यासारख्या व्याधी उत्पन्न होऊन त्याला केव्हा हृदयविकाराचा झटका येईल हे देखील शेवटी सांगता येत नाही.त्यामुळे वेळीच माणसाने सावध झालं पाहीजे.आपल्या सभोवतालच्या माणसाशी माणसासारखेच वागलं पाहीजे.स्वतःच्या स्वार्थापूर्वी परोपकार किंवा परमार्थ कसा साधता येईल.याकडे लक्ष्य दिले पाहीजे. कारण त्याच्या स्वार्थी स्वभावाने इतराची हानी न होता केवळ स्वार्थी माणसाचीच हानी होत असते.आपला देश,आपला धर्म, आपले धर्मग्रंथ,आपले आई वडील आपल्याला मानवता धर्माची शिकवण देत असतात. परोपकार करण्यास सांगत असतात.परंतु दुदैवाने आजच मानव त्याच्या स्वार्थी व हेकेखोर स्वभावामुळे देश-धर्म-धर्मग्रंथ-आईवडीलांची शिकवण पायदळी तुडवून माणूसकीला काळीमा फासून दुसऱ्याच्या निंदानालस्ती,टिका टिप्पणी,चुगलखोरी करण्यात आयुष्य खर्ची घालून स्वतःचेच खच्चिकरण करून घेतो आहे.आपल्या सनातन हिंदु धर्मात प्रत्येक सण आणि उत्सव हे परोपकारासाठी असतात.हे सण उत्सव मुख्यतः "सणांचा राजा दिपावली" उत्सव म्हणजे परस्परातील स्नेह-श्रद्धा-विश्वास आणि सत्कर्माचे प्रतिक असलेला उत्सव असतो. त्यामुळे दिपावली उत्सवाचा आनंद आपल्यामधील स्वार्थ आणि दुर्गूनांना तिलांजली देऊन परस्परांविषयी प्रेम-जिव्हाळा-आदर-आपुलकी आणि सुविचारांची आदान प्रदान करण्यासाठी सण साजरा केला पाहीजे.मानवता हाच आपला धर्म मानून सर्वधर्मियांना समानतेची वागणूक दिली पाहीजे.असे आवाहन विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे.