कारंजा- दिनांक ०६/०६/२०२३ रोजी सायंकाळी ०५.०० ते ०७.०० वा. दरम्यान मा. पोलीस अधिक्षक बच्चन सिंह सा. (IPS) यांनी पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे अचानक भेट दिली. सदर भेटी दरम्यान पोलीस स्टेशन कारंजा शहर येथील कामाचा आढावा घेतला असता उत्कृष्टरित्या दिलेले कर्तव्य पार पाडल्याबद्दल पोकॉ गिता शिरसाठ यांनी क्राईमचे कामकाज उत्कृष्ट केले, पोकॉ मिथुन सोनोने यांनी गोपनियचे कामकाज उत्कृष्ट केले, पो.कॉ पुजा काटे यांनी पगारपट (हेड मोहरर) चे कामकाज उत्कृष्ट केले, पोकॉ वैभव गाडवे यांनी सीसीटीएनएस अँडमीन व सायबर संबधीत हरवलेले मोबाइल हस्तगत करण्याचे कामकाज उत्कृष्ट केले. याबद्दल सर्वांचा सत्कार करून प्रोत्साहन पर तात्काळ बक्षिस जाहीर केले.तसेच कर्मचारी यांना निजी कार्यासाठी कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयीन कोणत्याही अडी-अडचणी असल्यास त्याबाबत पाठपुरावा करून सोडवण्यात येईल, तसेच सर्व कर्मचारी यांनी आप-आपल्या कुटूंबाकडे, व स्वतःचे शरीराकडे लक्ष देऊन कर्तव्य करावे या बाबत मोलाचे मार्गदर्शन केले. ह्यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी जगदिश पांडे,शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक आधारसिंह सोनोने तसेच पोलिस कर्मचारी उपस्थित होते.