31 मार्च रोजी अचानक वादळी वाऱ्यामुळे कारंजा तालुक्यातील तडाखा बसलेल्या गावांचा व शेतातील पिकांचा सर्वे करण्याचे निर्देश आमदार राजेन्द्र पाटणी यांनी तहसीलदार धीरज मांजरे यांना दिलेत. तालुक्यांतील अनेक गावांना अचानक आलेल्या वाऱ्यामुळे व पाऊसा मुळे पडझड झालेल्या घरांची, टिन छप्पर उडून गेल्याने झालेल्या नुकसानीची, पडलेल्या झाडांची, नुकसान झालेल्या शेतातील पिकांची पाहणी करण्याचे सांगण्यात आले. गावातील विद्युत यंत्रणा प्रभावित होवून जिवंत तार तुटून पडले असल्यास अती तात्काळ यंत्रणा कामास लावण्याचे सांगण्यात आले . कारंजा विद्युत विभागाचे ठाकरे यांना या विषयी सांगण्यात आले असुन या कामी यंत्रणा कामी लावल्याचे विद्युत अधिकारी यांनी सांगीतले.
भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे यांना ग्रामस्थांचे फोन आलेत त्यांनी नुकसानीची माहीती दीली असता त्यांनी आखतवाडा येथे भेट दिली पडझड झालेल्या व छप्पर उडून गेलेल्या काही घरांची पाहणी केली. येथील गरीब ग्रामस्थांचे घरावरील टिनाचे छप्पर उडून गेले, टिन पडलेत, जनावर जखमी झाली त्यामुळे येथील ग्रामस्थ चिंतेत होते ते आपले घरदाखवत नुकसान झाल्याचे सांगत होते. येथील वास्तव येथील शेकडो घरे अजूनही कच्चे आहे या विषयी डॉ राजीव काळे यांनी येथे यावेळीउपास्थित ग्रामसेवक, पटवारी यांच्यासी चर्चा केली असता ग्रामसेवकांनी यावर्षी फक्त 4घरकुल होत असल्याचे वास्तव उजागर केले. शेकडो लोकांची यादी असताना दरवर्षी 4 घरकुल जर संबधित यंत्रणा करीत असेल तर या गरिबांना घरकुल केव्हा मिळेल या निमित्ताने या ठिकाणी ग्रामस्थ विचारीत होते.
2024 पर्यंत घरांचे उदिष्ट पुर्ण करण्याच्या उद्दिष्टास हरताळ फासण्याचे कार्य येथे दिसून आले तेव्हा अतिशय गंभीर असा हा प्रश्र्न मार्गी लावावा असे ग्रामस्थ सांगत होते.
यावेळी डॉ राजीव काळे यांच्या सोबत संजय भेंडे,अक्षय देशमुख, सुरेश गिरमकार, शुभम बोनके, दिनेश वाडेकर, संजय लहानकर इत्यादी होते. यावेळी गावातील राठोड, राजु भागवत सह गावातील अनेक मान्यवर व्यक्ती सह गावातील नागरिक उपस्थित होते. असे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक संजय भेंडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदला कळविले असल्याचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी सांगीतले आहे .
बॉक्स-
शेकडो घरांची घरकुल यादी येथे असतांनी वर्षात फक्त 4 घरे पुर्ण करण्याचे उदिष्ट येथील ग्राम प्रशासन व पंचायत समिती प्रशासन ठेवत असेल तर हा प्रश्र्न गंभीर असुन याची आपण दखल घेत असुन हा प्रश्र्न आमदार राजेन्द्र पाटणी यांचेकडे घेऊन जावून याची दखल घेवू असे भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे यांनी सांगितले. येथील ग्रामस्थांना लवकरच घरकूल देण्याचे यशस्वी प्रयत्न करू असे सांगीतले.