कारंजा (लाड) : महाराष्ट्रातील प्रथम श्रेणी तिर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्त उपासकांच्या श्री नृसिह सरस्वती स्वामी महाराजांच्या श्री गुरुमंदिरात, श्रींच्या 324 व्या जन्मोत्सवाला सालाबादच्या प्राचिन परंपरेप्रमाणे, येत्या दि . 13 जानेवारी पासून प्रारंभ होणार असून सदर धार्मिक व आध्यात्मिक महोत्सव दि. 25 फेब्रुवारी पर्यंत सलग 45 दिवस चालणार असल्यामुळे दत्तउपासकांकरीता ही आनंदाची पर्वणी असणार आहे.श्री गुरु दत्तात्रयाचे द्वितीय अवतार असलेले श्रीगुरुमाऊली श्री नृसिह सरस्वती स्वामी हे एकमुखी दत्त म्हणूनही ओळखले जातात. श्रींच्या पादुकांचे दर्शन झाल्यानंतर येथे राहून श्रीगुरुचारित्र पारायण करण्याचे सुद्धा फार महत्व आहे.त्यामुळे जगभरातील देशविदेशातून येथे दत्तउपासकाची सतत मांदियाळी अनुभवयाला मिळत असते. पंचेचाळीस दिवसांच्या उत्सवात तर येथे आनंदाला उधाण आलेले असते. स्थानिक श्रीगुरु मंदिर मधून आमचे लोकप्रिय प्रतिनिधी संजय कडोळे यांनी प्राप्त केलेल्या माहितीनुसार दि. 13 जानेवारी 2024 रोजी उत्सवाचा प्रारंभ होणार असून सकाळी सकाळी 07:00 पासून श्रींच्या अंखड विणावादन नामस्मरणाला प्रारंभ होईल.महाभिषेकानंतर सकाळी 09:39 वाजता मुलताईचे किर्तनकार हभप प्रणय महाराज जोशी यांचे हरिकिर्तन, दुपारी 12:00 वाजता वेदशास्त्री संपन्न दिनेश महाराज जोशी यांचेवडून अध्याय वाचन, दुपारी 12:30 वाजता महाप्रसाद, दुपारी 03:00 वाजता इंदोरचे हभप बाबासाहेब तराणेकर महाराज यांचे प्रवचन, सायंकाळी 06:00 वाजता श्याम देशमुख व सहकारी यांचे संकिर्तन, सायंकाळी 07:00 वाजता श्रींची पालखी मंदिर परिक्रमा, आणि रात्री 10:00 वाजता लोकमान्य भजनी मंडळ कारंजा यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 45 दिवस दररोज दैनंदिन कार्यक्रमासोबतच जगप्रसिद्ध गायक ,कलावंत, किर्तनकार, प्रवचनकार यांचे कार्यक्रम होणार आहेत.