वाशिम: वाशिम जिल्हा गोंधळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष, श्री कामाक्षा मातेचे गोंधळी ,जय भवानी जय मल्हार गोंधळी कला संच कारंजाचे संचालक असलेले, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त एकमेव असे गोंधळी लोककलावंत संजय मधुकरराव कडोळे यांना, लगीनसराईत "गोंधळ - जागरणाचे" कार्यक्रमा करीता वाढती मागणी असते . सध्या संजय कडोळे यांचेकडे तिन महिन्याच्या गोंधळ - जागरणाच्या तारखा बुक झालेल्या आहेत . ते देवीचा गोंधळ, खंडोबा बानुम्हाळसाचे, बहिरमचे जागरण करतात .त्यांचे सोबत त्यांचे जय भवानी जय मल्हार गोंधळी कला संचात त्यांचे लहान भाऊ कमलेश कडोळे, भाचे प्रतिक हांडे, तसेच दोन - तिन मुरळ्या व लोककलावंत मित्र मंडळी असतात . संजय कडोळे हे स्वरचित कार्यक्रम सादर करतात. आपल्या कार्यक्रमामध्ये ते श्रद्धा आणि मनोरंजनाचा उत्तम संगम साधतात . हसी - मजाक करीत कार्यक्रमाला रंगत आणतात . आणि हुंड्याची कुप्रथा, व्यसनमुक्ती व अंधश्रध्दा निर्मूलन करतात . हे त्यांच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट होय .स्वतःते उत्कृष्ट कवि, लेखक, साहित्यीक, व्याख्याते, प्रवचनकार तसेच सन 1986 पासून निर्भिड पत्रकार असून त्यांचा महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन, माजी राज्यमंत्री ना. राजकुमार बडोले, सिनेअभिनेत्री निशिगंधा वाड, सप्तखंजेरी प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा हस्ते गुणगौरव केलेला आहे . गोंधळ - जागरण या लोककलेबद्दल अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रात हिंदु समाजात, लग्नप्रसंगी लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर कुळदैवत आई तुळजाभवानीला प्रसन्न करण्याकरीता "गोंधळ - जागरण" करण्याची प्रथा किंवा परंपरा आहे . गोंधळ - जागरणाने वास्तू शांती, गृहशांती होते . पितराचा दोष दूर होतो . नवग्रह शांती, मंगळदोष निवारण, साडेसाती पिडा दूर होते . नवरी - नवरदेवाचा संसार सुखाचा होतो अशी समजूत आहे . त्यामुळे महाराष्ट्रात गोंधळ - जागरणाला अनन्यसाधारण महत्व आहे .