कारंजा : कारंजा येथील ऐतिहासिक प्राचिन अशा श्री कामाक्षा देवी मंदिरात दरवर्षी जळगाव [ खान्देश ] येथील सुप्रसिद्ध सनईवादक प्रमोदजी गुरव हे दर्शनार्थ येवून सनई वादन सेवा पूर्णपणे मोफत समर्पित करीत असतात . त्याप्रमाणे सोमवार दि. ३ ऑक्टोबर रोजी महाअष्टमीचे पर्वावर त्यांनी आपली सनई वादन सेवा दिली .
यावेळी त्यांनी आपल्या सनई मधून अनेक भक्तिगीते गायली . याप्रसंगी हभप दिगंबरपंत महाजन महाराज, हभप संजय महाराज कडोळे, हभप संतोष महाराज गावंडे, सुनिलजी बेलोणकर, राहुल महाजन, रोहीत महाजन यांनी श्री कामाक्षा संस्थान कडून शाल श्रीफळ देवून त्यांचे स्वागत केले .