कारंजा(लाड) : मित्रहो!ऐका माझे वचन।जरी व्हावे वाटे गावाचे कल्याण।तरी सामुदायिक प्रार्थना-साधन।सोडू नका कधी ही॥विश्वी होऊ शकेल शांतता। तेथे गावाची कोण कथा?। सामुदायिक प्रार्थनाच करील एकता।नित्यासाठी,तुकड्या म्हणे -ग्रामगीता
श्री.गुरुदेव सेवा मंडळ तसेच महिला भजनी मंडळ द्वारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या पुण्यस्मृती अर्थात सर्व संतस्मुती मानवता दिन महोत्सव श्री.गुरुदेव सेवा मंडळाच्या पंचवार्षिक महोत्सवा मधील पहिला महोत्सव गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्ताच्या निमित्याने धन्य संताची महिमा आली जगताच्या कामा या प्रमाणे आज विचाराने अस्थिर झालेल्या जगाला साधू संताच्या व महापुरुषांच्या विचाराची नितांत गरज आहे.या साठी महामानवांच्या विचाराचा ज्ञानपाठ गावागावात जगता असणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.वरील कार्य कार्यक्रमातून ही प्रेरणा आपणास मिळेल या पवित्र हेतूने श्री.छत्रपती शिवाजी महाराज नगर हनुमान मंदिर कारंजा (लाड) येथे रविवार दि. 30 मार्च 2025 रोज रविवारला दुपारी 3 वाजता भजन सत्संग ग्रामगीता प्रबोधन तसेच भव्य दिव्य विशाल सर्वधर्म सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाला सहपरिवार उपस्थित राहावे असे आव्हान गुरुदेव सेवा मंडळाचे चंदूभाऊ जाधव दामोदर जोंधळेकर संतोषदादा केळकर सुनीलभाऊ गुंठेवार कारंजा (लाड)तसेच महिला भजनी मंडळ शिवाजी नगर कारंजा (लाड)यांनी केले आहे.या कार्यक्रम सोहळ्याचे उद्घाटक पंजाबराव बाकल जिल्हा कार्यकारणी सदस्य कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणभाऊ सालोडकर आ.जीवन प्रचारक जिल्हा सेवाधिकारी वाशिम रामबकस डेंडुळे कारंजा तालुका भजन प्रमुख श्री.संजयराव क्षिरसागर ग्रामगीताचार्य गुरुकुंज आश्रम श्री.गोपालभाऊ काकड ग्रामगीताचार्य गुरुकुंज आश्रम श्री.प्रल्हादराव पानझाडे ग्रामगीताचार्य गुरुकुंज आश्रम कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणभाऊ सालोडकर आ.जीवन प्रचारक श्री.गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम उद्घाटक प्रा.अनुप नांदगावकर साहित्यिक प्रमुख अतिथी प्रा.संजयरावजी बोके भजन प्रमुख कारंजा, भास्करराव भावनगरे अकोला अर्बन बँक कारंजा, सेवा ही संपत्ती खरी न सरे जन्मजन्मांतरी!रोज बजेगी खंजिरी या विषयावर प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमांमध्ये श्री.गुरुदेव शारदा महिला भजनी मंडळ वेदांत नगर कारंजा,श्री.गुरुदेव नागनाथ महिला भजनी मंडळ वाणीपुरा कारंजा,श्री.गुरुदेव श्रीराम महिला भजनी मंडळ सहारा कॉलनी कारंजा, श्री.गुरुदेव महिला भजनी मंडळ शांतीनगर कारंजा,श्री.गुरुदेव संत गजानन महाराज महिला भजनी मंडळ बायपास कारंजा, श्री.गुरुदेव तुळजाई महिला भजनी मंडळ सहारा कॉलनी गायकवाड नगर कारंजा,इत्यादी महिला भजनी मंडळाचा भजन सादरीकरण करण्यात येणार आहे.मला आवडलेली ग्रामगीतेची एक ओळ लहान मुलावरील संस्कार संस्कृती ग्रामगीतेतील महिलो उन्नती या अद्यायावर सौ.ज्योतीताई उगले महिला जिल्हा सेवाधिकार,सौ आश्विनीताई सस्तीकर,श्रीमती राधाताई मुरकुटे,श्रीमती यमुनाबाई राठोड,सौ.हर्षाताई अंधारे,सौ.सीमाताई सातपुते, सौ.छायाताई गावंडे,यांचे प्रबोधन आयोजित करण्यात आले आहे.त्याच्या नंतर सर्वधर्म सामुदायीक प्रार्थना घेऊन राष्ट्रवंदने समारोप केल्या जाईल.तरी या कार्यक्रमाला कारंजा (लाड) येथील गुरुदेव प्रेमी उपासकांनी तसेच राष्ट्रसंताच्या पाईकांनी व सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे अशी विनंती अ.भा.श्री.गुरुदेव सेवा मंडळ वाशिम जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विजय खंडार यांनी केली आहे.