कारंजा : सलग पाच सहा दिवसां पासून अवकाळी पाऊसाचे तांडव सुरु असून, उद्या सोमवारी दि १ मे २०२३ रोजी सकाळी, साजरा होणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमावर पाऊसाचे सावट दिसून येत आहे. महाराष्ट्र दिनाच्या पाश्वभूमिवर उद्या विविध शासकिय कार्यालये, विविध शैक्षणिक संस्था शाळा महाविद्यालयावर ध्वजारोहण होणार असून नागरिकांनी सतर्क राहून ध्वजारोहणाला उपस्थित राहण्याचे आवाहन संबधित संस्थाकडून करण्यात आल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे.