कारंजा-दारव्हा मुख्य मार्गावरील विज उपकेंद्राजवळ आज सायंकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बोलेरो पिकअप वाहनाने भरधाव वेगाने येत दोन दुचाकींना समोरून जबर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे:
सुभाष किशन चव्हाण (वय ५५, रा. शिक्षक कॉलनी, कारंजा)
नाना जयसिंगपूर (वय ५६, रा. खरडगाव)
तसेच अपघातात दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचारासाठी तत्काळ कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी एका जखमीची स्थिती अत्यवस्थ असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट असले तरी अति वेग आणि निष्काळजीपणा हे मुख्य कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अपघातामुळे कारंजा-दारव्हा मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला