वाशीम : सततधार पाऊस त्यातही, ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे,संपूर्ण राज्याच्या शेतजमिनीसह पश्चिम विदर्भासह वाशीम जिल्हा व कारंजा तालुक्यात व परिसरात झालेल्या अतिवृष्टिमुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, जी काही पिकं वाचली. त्या पिकांचा एकतर अळ्या व किडीने सर्वनाश केला. किंवा अनेक भागात सोयाबीन पिकाला शेंगा धरल्या नाहीत आणि जिथे शेंगा आहेत तेथे पावसामुळे आतमध्ये शेंगमध्ये कोंब फुटलेले असून, उत्पन्नाची आशा धुसर झालेली आहे. त्यामुळे शासनाने सरसकट पिकपहाणी करून कोणताही सावत्रभाव न भेटता राज्यात सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर करावा. कोणतेही पंचनामे न करता करून,सरसकट सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करून, नुकसान भरपाईची जास्तितजास्त मदत जाहिर करण्यात यावी.गेल्या महिन्याभरापासुन सतत कोसळत असलेल्या पावसामुळे, वाशीम जिल्हयातील आणि कारंजा परिसरात व तालुक्यातील शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेल्या सोयाबीन,तुर,कापुस,संत्रा व इतर पिके भुईसपाट झाली असुन नदी नाल्या काठावरील आणि डाबरीची संपुर्ण शेती खरडुन गेली आहे. चालू हंगामात शेतकऱ्यावर आलेल्या आस्मानी संकटामुळे शेतकरी पुर्णपणे कंगाल झाला आहे. ऐन दिवाळी सणासुदीच्या दिवसात उत्पन्नाचे स्त्रोत असणारे पाहिले पिक सोयाबीन हातचे गेल्यामुळे, दसरा दिवाळीच्या दिवसात त्याचेवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. या भयावह आस्मानी संकटात शेतकऱ्याला परत उभं करणे आता शासनाचे कर्तव्य आहे.त्यामुळे शासनाचे वतीने कारंजा मानोरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून, येथील शेतकऱ्यांना कर्जमाफी सह सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी मित्र असलेले, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय मधुकरराव कडोळे यांनी शासनाकडे लावून धरली आहे.