कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ) :भारतिय रिझर्व बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे की, दोन हजाराची नोट बंद करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात रिझर्व बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, यापुढे सर्वच बँकानी दोन हजारची नोट प्रत्यक्ष व्यवहारात बँक ग्राहकांना व नागरीकांना देवू नये. दि. २३ मे २०२३ ते दि. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बॅकामध्ये जमा करण्याची रिझर्व बॅकेकडून मुदत देण्यात आलेली आहे.या संदर्भात एकावेळी ग्राहकांना दहा नोटा म्हणजेच वीस हजार रुपये बदलून देण्यात येणार असल्याचे सांगीतले आहे. या निर्णयामुळे दोन हजार रुपयाच्या नोटेची छपाई रिझर्व बॅकेकडून बंद करण्यात येत असून,रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून सर्व बँकांना नागरीकांकडून परत घेण्याचे निर्देष दिलेले आहे.या संदर्भात स्पष्ट करण्यात येते की,मागील काही वर्षापूर्वी दि. ८ नोहेंबर २०१६ रोजी रात्री ८:३० वाजता प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांनी अचानक चलनातील पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटाची बंदी करून नागरीकांना एक धक्का दिला होता.यामागे दाबून ठेवलेला काळा पैसा उघड करण्याचा शासनाचा उद्देश होता. त्यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयाच्या नविन नोटा शासनाकडून चलनात आल्या. सुरुवातीला दोन हजार रुपयाची नविन गुलाबी नोट चलनात आल्याने सर्वसामान्याच्या हातात ज्यावेळी ही नोट यायची त्यावेळी या नोटेचे सुटे (चिल्लर) कोठे मिळवावे ? असा प्रश्न सर्वसामान्य व्यक्तींना,रोजच्या चाकरमान्यांना आणि मजूर वर्गाला पडत होता व दोन हजार रुपयाच्या चिल्लर करीता त्यांना गावभर भटकावे लागत असे.याचा सर्वात जास्त त्रास राज्य परिवहन महामंडळाच्या चालक वाहकांना सुद्धा नाहकच सहन करावा लागला होता.मात्र त्यानंतर गेल्या जवळ जवळ सन २०२०-२०२१ पासून मात्र दोन हजार रुपयाची नोट चलनातून बाद झाल्या प्रमाणेच अदृश्य झाल्याचे दिसून येत होते.तेव्हा ही दोन हजार रुपयाची नोट गेली तरी कोठे ? हा प्रश्न तळागाळातील सर्वसामान्यांना पडलेला होता. मात्र आज जेव्हा रिझर्व बँकेकडून दोन हजार रुपयाची नोटबंदी करण्याचा निर्णय जाहीर झाला. त्यावरून स्पष्ट होते की,ज्या उद्देशाने सन २०१६ मध्ये तत्कालिन नोटा बंद करून नवीन नोटा व्यवहारात आणण्यात आल्या.तशाच प्रकारे दडवून ठेवलेल्या दोन हजार रुपयाच्या नोटा परत एकदा बाहेर काढण्याकरीता म्हणजेच काळं धन बाहेर काढण्याकरीता आजची दोन हजार रुपयाची नोटबंदी जाहीर झाली असावी. या निर्णयामुळे काळे धन गोळा करणार्याची परत एकदा तारांबळ उडणार आहे एवढे मात्र निश्चितच आहे. एकप्रकारे काळे धन जमविणाऱ्या करीता हा सर्जिकल स्ट्राईक आहे.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अधक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.