कारंजा : कारंजा नगरीचे शिल्पकार संस्थापक असलेले करंजऋषी यांनी स्थापन केलेल्या अब्जोवधी वर्षापूर्वीच्या, आदिशक्ती श्री कामाक्षा देवीचे कारंजा शहरातील शहर पोलीस स्टेशन समोर, गोंधळीनगर येथे मंदिर आहे. ह्या मंदिरात दर्शनार्थी म्हणून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवराय आल्याचे आणि त्यांना आई तुळजा भवानी स्वरूपात आई श्री कामाक्षा मातेने दर्शन दिल्याची आख्यायिका असून, आसाम प्रांतातील गोहाटी येथील श्री कामाख्या देवीचे शक्तिपिठ म्हणून हे ओळखले जाते. ही श्री कामाक्षा माता नवसाला पावणारी जागृत देवता म्हणूनही ओळखली जाते अशा ह्या श्री कामाक्षा मातेचे फोटो मिळावे म्हणून मागणी असल्यामुळे जय भवानी जय मल्हार गोंधळी वारकरी मंडळाचे प्रमुख कार्यवाह तथा साप्ताहिक करंजमहात्म्यचे संपादक संजय कडोळे यांनी आपले मित्र शिक्षक आमदार एड किरणराव सरनाईक आणि वर्गमित्र भाजपाचे शहराध्यक्ष तथा कृष्णा कृषी बाजारचे मालक ललितजी चांडक यांच्या सहकार्याने श्री कामाक्षा देवीचे कॅलेंडर व आरती संग्रहाचा विशेषांक प्रसिद्ध करून नवरात्रा निमित्त घरोघरी मोफत वितरण केले . त्यांच्या ह्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. असे मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील खंडार यांनी कळविले आहे .