स्थानिक श्री श्रावणजी बगमारे शिक्षण संस्था ब्रह्मपुरी द्वारा संचालित डॉ पंजाबराव देशमुख कॉन्व्हेंट ब्रह्मपुरी येथे विविध उपक्रम नेहमीच साजरे केले जातात. दिनांक 17 डिसेंबर 24 ला प्राचार्य मनिषा ताई बगमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ पंजाबराव देशमुख कॉन्व्हेंट येथे विद्यार्थ्यांमध्ये वेस्ट मधून बेस्ट तयार करण्याचे प्रशिक्षण मिळावे व फूड मेल्याच्या माध्यमातून व्यवसायाचे बाळकडू मिळावे या उद्देशाने क्राफ्ट मेला व फूड मेला आयोजित केला होता.
याप्रसंगी जवळपास क्राफ्ट मेला मध्ये 40 विद्यार्थी तर फूड मेला मध्ये 70 विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला व उत्तम कलाकृती सादर केल्या .
या क्राफ्ट व फूड मेल्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रा प्रकाशजी बगमारे यांनी केले याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष तथा प्राचार्य डॉ पंजाबराव देशमुख कान्वेंट मनीषाताई बगमारे, डॉ पंजाबराव देशमुख कॉन्व्हेंट चे डायरेक्टर शंतनु बगमारे, व डॉ पंजाबराव देशमुख गर्ल्स ज्युनिअर कॉलेज च्या प्राचार्य शारदाताई ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी डॉ पंजाबराव देशमुख कॉन्व्हेन्ट येथील सर्व शिक्षिका व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले घेतले.