कारंजा : ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालय केन्द्र कारंजा येथे शुक्रवार रोजी दरवर्षी प्रमाणे यंदाही सकाळच्या मुरलीनंतर, राजयोगिनी ब्रह्माकुमारी मालती, ब्रम्हाकुमारी नयना दीदी, ब्रम्हाकुमारी रीना दीदी,यांच्या प्रमुख उपस्थितीत, राधा कृष्णाची वेशभूषा केलेल्या राधा कृष्ण यांचे राजयोगीनी ब्रम्हकुमारी मालती दीदीच्या हस्ते तिलकपूजन करून राधा कृष्ण यांचे सुमधूर गायन नृत्य ,रासक्रिडा कार्यक्रमाचे विलोभनिय असे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये ब्रह्माकुमार भाई,ब्रह्माकुमारी बहन यांनी सुद्धा राधा कृष्णा सोबत नृत्या मध्ये सहभाग घेऊन श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद साजरा केला.यावेळी ब्रह्माकुमार प्रदिपभाई वानखडे, साखरकर भाई ,केशवराव , शिरभाते, दिलीपभाई ताटे, अजयभाई गाडगे,ब्रह्माकुमारी शोभा बहन,सरोज बहन, आशा बहन,लता बहन, रंजनाबहन,मंदा बहन, कुसुम बहन,चंदनशे बहन, पाठे बहन, रेखा बहन, सुरेखा बहन, उषा बहन, पुष्पा बहन, निशा बहन, कविता बहन, मनिषा बहन, सुशीला बहन, अलका बहन, मिना बहन, सुधा बहन, साधना बहन, सुभद्रा बहन, मिना बहन, वैशाली बहन, प्रमिला बहन, द्रोपदी बहन, चंद्रा बहन इत्यादी उपस्थित होते . उपस्थितांना काल्याचे वितरण करण्यात आले. रविवारी दि२१ ऑगष्ट रोजी ब्रम्हाकुमार प्रदिपभाई वानखडे यांच्या योगदानातून सर्वांना ब्रम्हाभोजन देण्यात आले . यावेळी असंख्य अतिथींनी ब्रम्हाभोजनाचा लाभ घेतला. असे वृत्त कार्यक्रमाला अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रत्यक्षदर्शी महाराष्ट्र साप्ताहिक पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष ब्र. कु.संजय कडोळे यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....