वरोरा तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायत मध्ये दिनांक 24 मार्च रोजी घेण्यात आलेल्या मासिक सभेत दहेगाव येथील महिला आणि पुरुषांनी अवैध दारू विक्री संदर्भात तक्रार अर्ज दाखल केला, या अर्जामध्ये गावामध्ये चालत असल्याने अवैध दारू विक्री संदर्भात महिलांनी व पुरुषांनी आपल्या समस्या या मासिक सभेत मांडल्या या समस्यांमुळे गावातील वातावरण पूर्णपणे बिघडले असून गावातील दारुड्यांना अवैध दारू गावातच मिळत असल्याने त्यांना गावाच्या बाहेर जावे लागत नाही आहे, वाटेल तेव्हा हवे असेल तेव्हा ही अवैध दारू गावातच मिळत असल्याने दारू पिणाऱ्यांमध्ये याची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे चौकात अशील बोलणे भांडण तंटे महिलांना मारहाण चोऱ्या करणे ासारख्या यासारख्या घटनेत वाढ झालेली आहे, उद्भवलेल्या समस्या मुळे गावातील वातावरण बिघडले असून महिलांमध्ये भीतींचे वारणा वातावरण निर्माण झालेले आहे या सर्व गोष्टीचा पोलिसांनी गांभीर्याने विचार करून या अवैध दारू विक्रीला अंकुश लावावा म्हणून ग्रामपंचायत दहेगाव तर्फे पोलीस स्टेशन वरोरा येथे दहेगाव ग्रामपंचायत चे सरपंच विशाल पारखी यांच्यासोबत अनेक महिलां ने निवेदन सादर करण्यात आले, या निवेदनाच्या संदर्भात वरोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल काचोरे यांनी येत्या 24 तासात अवैध दारू विक्री बंद करण्याचे आश्वासन दिले
वरोरा तालुक्यात अनेक खेडे विभाग हाकेच्या अंतरावर असून या खेड्यांमध्ये वरोरा येथील एक व्यक्ती रात्रीच्या सुमारास एका वाईन शॉप मधून अवैध देशी दारू ची उचल करून या खेडे विभागात पोहोचवण्याचे काम दारू विक्री चालू झाली तेव्हापासून सुरू आहे असे असतानाही आज अनेक महिने लोटूनही पोलिसांना याची माहिती नसावी याबद्दल नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे एनसा गावाजवळ एका धाब्यावर याच प्रकारची अवैध दारू मोठ्या प्रमाणात विक्री केल्या जात असतानाही पोलिसांना याची संपूर्ण माहिती असूनही यावर कारवाई केली जात नाही आहे त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.