वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिता चव्हाण यांनी नुकतीच जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा महिला रुग्णालयात भेट देवून महिला रुग्णांशी संवाद साधला. रुग्णालयात मिळत असलेल्या आरोग्य सेवेबाबतची महिती महिला रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून जाणून घेतली. यावेळी ॲड. चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी, ओपीडी, सिटी स्कॅन, एक्से-रे, बाहयरुग्ण विभाग, प्रसुती कक्ष, शस्त्रक्रीयागृह, डायलेसीस विभाग, प्रसुतीपूर्व व प्रसुती पश्चात विभाग, नवजात शिशू विभाग, महिला वार्ड, रक्तपेढी विभाग व पॅथॉलॉजी विभागाला भेट देवून पाहणी केली. रुग्णांशी व रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांनी रुग्णांना मिळत असलेले उपचार व औषधीबाबत विचारणा केली. महिला रुग्णांनी व नातेवाईकांनी चांगल्याप्रकारे येथे आरोग्य सेवा मिळत असल्याची माहिती त्यांना दिली.
रुग्णालयात भरती झालेल्या प्रत्येक महिलेची रुग्णालय प्रशासनाने काळजी घेवून उपचार करावे. त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा मिळाली पाहिजे यासाठी प्रत्येक डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसेच प्रत्येक वार्ड कायम स्वच्छ राहील याकडे विशेष लक्ष द्यावे. अशा सुचना त्यांनी भेटी दरम्यान केल्या. ॲड. चव्हाण यांनी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारीकांशी संवाद साधून विचारपूस केली. आपले कर्तव्य बजावतांना स्वत:च्या व कुटूंबाच्या आरोग्याकडे देखील लक्ष द्यावे. तसेच रुग्णालयात उपचारासाठी येणारी प्रत्येक महिला ही आपली आई किंवा बहिण आहे या भावनेतून तिची सेवा करा. उपचार करुन घरी जातांना महिला रुग्णाला आपल्या सेवेची कायम आठवण राहील अशाप्रकारची सेवा आणि सौजन्यपूर्ण वागणूक त्यांना परिचारीकांनी द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा रुग्णाल्याच्या ॲड. चव्हाण यांच्या भेटी प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सिध्दार्थ खेळकर, डॉ. लक्ष्मीकांत राठोड, डॉ. मोरे, महिला स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. लोणकर, डॉ. प्रतिभा गोरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बाळासाहेब सुर्यवंशी, परिवीक्षा अधिकारी जी.एन. पडघन, गणेश ठाकरे, एस.एम. जठाळे, श्रीमती काळे, श्री. उचित, श्रीमती पुनम खंडारे, श्री. पठाण, श्री वसीम, श्री. गजबे, श्री सराफ, श्री मानतोडे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....