आरमोरी बाजारपेठ ही नावाजलेली बाजारपेठ म्हणून ओळखली जाते यात तालुक्याच्या ठिकाणावरून 10-15 किलोमीटर वरून नागरिक बाजार करण्यासाठी येत असतात आणि आपल्या उपजीविकेसाठी लागणारा जिनन्स खरेदी करतात.
आरमोरी आठवडी बाजार हा नगर परिषद आरमोरी कार्यालयासमोर भरत असतो आणि तो रस्ता आरमोरी -वैरागड रस्त्यावर असल्यामुळे रहदारी साठी मार्ग सुकर असल्याने कोणतेही जड वाहन जसे ट्रॅक्टर, कार, टू-व्हीलर कधी कधी ट्रक जातो आणि ठानेगाव रस्ता पर्यायी असूनही रहदारी कमी झालेली आहे या रस्त्याला जड वाहनामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते त्याकरिता स्थानिक प्रशासनासोबत इतर विभागाने लक्ष देऊन शुक्रवारी आठवडी बाजार दिवशी जड वाहनाना पर्यायी रस्त्याचा वापर केल्यास कोंडीची अडचण दूर होईल अशी नागरिकांची मागणी आहे