वाशिम : सध्या वाशिम जिल्ह्यात अखिल भारतिय मराठी नाट्य परिषद मुंबईच्या मध्यवर्ती कार्यकारिणी करीता,नियामक मंडळ निवडणूकीचे वारे वहात असून, वाशिम जिल्ह्यामधून नाट्य कलावंताच्या पहिल्या पसंतीचे उमेद्वार कारंजा [लाड] येथील हाडाचे सामाजिक कार्यकर्ते तथा नाट्य कलावंत कव्हळकर नंदकिशोर अंबादास आणि देशमुख उज्वल दत्तात्रय हे निवडणूक रिंगणात असून, त्यांची बाजू सक्षम मानली जात आहे. या संदर्भात आम्ही भ्रमणध्वनीवरून,सध्या जापान अभ्यास दौऱ्या निमित्त विदेशात असलेल्या, अमरावती शिक्षक मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अँड किरणराव सरनाईक यांचे मत जाणून घेतले असता त्यांनी सांगीतले की, "नाट्यकलावंताच्या वेदना जाणून त्यांच्या समस्यांच्या पूर्ततेकरीता आणि वृद्ध कलावंताच्या मानधन आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यास अंगी सक्षम नेतृत्व असणारे, कव्हळकर नंदकिशोर अंबादास व देशमुख उज्वल दत्तात्रय हे उमेद्वार आपल्याला लाभलेले असून ते निवडून आल्यास वाशिम जिल्ह्यातील नाटकलावंताच्या समस्या सुटून, त्यांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत . त्यामुळे माझा त्यांना पाठींबा आहे. तरी जिल्हयातील नाट्य कलावंतानी त्यांनाच आपल्या पसंतीची मते देऊन, बहुमतानी निवडून द्यावे असे मी नाट्यकलावंताना आवाहन करीत आहे .