वाशिम : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अव्वल सचिव,तथा वाशिम जिल्ह्याचे सुपुत्र अमोल पाटणकर, हे एका विवाह सोहळ्या निमित्त कोंडोली या त्यांच्या मूळ गावी आले असता, आज शनिवारी दि 20 एप्रिल रोजी,मानोरा ते कारंजा रोडवर कुपटा घाटात एक ४०७ टाटा ट्रक पलटी झाला होता. त्यात ३० वऱ्हाडी जखमी होऊन ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहीती मिळताच गावी असलेले अमोल पाटणकर यांनी क्षणाचाही विलंब न करता "देवेंद्र फडणवीस दूत रूग्णवाहीका" चालकाची वाट न पाहता, घटनेचे गांभिर्य ओळखून, स्वतःच चालवित , सर्व जखमींना तात्काळ मानोरा रूगणालयात दाखल केले. तसेच तेथून ७ अत्यवस्थ जखमींना पुढील उपचारार्थ तात्काळ वाशिम येथील रूग्णालयात पाठविले.
अमोल पाटणकर यांचा हजरजवाबीपणा व लोकसेवेची कर्तव्यनिष्ठा तसेच लोकसेवेची धडपड बघुन जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे कौतूक होत आहे. असे वृत्त संजय कडोळे यांनी कळवीले आहे.