कारंजा*: ( वृत्त : संजय कडोळे कारंजा ) श्री सिद्ध सद्गुरुपिठ रामगाव (रामेश्वर) प्रमाणेच श्री सिद्ध सद्गुरु रामनाथ महाराज यांचे केवळ विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातच ठिकठिकाणी शांतीब्रम्ह श्री सिद्ध सद्गुरू रामनाथ महाराज यांचे ठिकठिकाणी मठ असून,बराच मोठा शिष्यपरिवार आहे. अमरावती विभागाच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगाव येथे देखील श्री सिद्ध सद्गुरू रामनाथ महाराज यांचा मठ असून येथे श्रींच्या वार्षिक नाथषष्ठी महोत्सवानिमित्ताने आणि श्री सिद्ध सद्गुरू शांतीनाथ महाराज यांच्या कृपाप्रसादाने
मिती फाल्गुन पौर्णिमा ; शुद्ध चतुर्दशी ते फाल्गुन वद्य षष्ठी, दि ६ मार्च ते दि १४ मार्च पर्यंत, वैष्णव सेवाश्रम शेवगाव धाराशिव येथील हभप सोमनाथ महाराज गवळी यांच्या अमृतमय वाणीमधून, श्रीरामचरितमानस - संगीतमय रामकथेचे आयोजन दररोज सकाळी ९:०० ते १२:०० व दुपारी ३:०० ते ५ :०० अशा दोन सत्रात करण्यात आले असून, त्यांची साथसंगत गायनाचार्य हभप ज्ञानेश्वर महाराज लोहाद, तबलावादक हभप जितेंद्र महाराज वाडेकर, व्हायोलिनवादक हभप सुखि (बाबा) महाराज हे करणार आहेत. त्या काळात दररोज सकाळी ४:३० ते ६:०० पर्यंत काकड आरती, ६ : ०० ते ७:०० आश्रमातील पादुकापूजन तथा ध्यानधारणा, सायंकाळी ५ : ०० ते ७ : ०० हरिपाठ आरती, संध्याकाळी ७:०० ते ९:०० पर्यंत हरिकिर्तन होणार असून आश्रमात दररोज दुपारी १:०० वाजता आणि रात्री ९ : ३० वाजता भोजनप्रसाद व्यवस्था होणार आहे. दररोज अनुक्रमे महाराष्ट्रातील नामांकित सुप्रसिद्ध किर्तनकार हभप विठ्ठल महाराज घोडसाड, पुसनेर ; हभप मधुकर महाराज पाचपुते, वाळकी ; हभप प्रशांत महाराज जाधव, आळंदी ; हभप गोपालनाथ महाराज, रामगाव (रामेश्वर ) ; हभप शिलनाथ महाराज, पंढरपूर ; हभप संजय महाराज अलोने, आळंदी ; आणि हभप सिद्ध सद्गुरू योगी शांतिनाथ महाराज लोहोगाव यांचे किर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत.
गुरुवार दि. ९ मार्च रोजी तुकाराम बिज असतांनाही शास्त्रीय संगीताच्या तालासुरात सिध्द सद्ग गुरु योगी शांतिनाथ महाराजांचे वय ८५ ते ९० वर्षाचे असतांनाही त्यांनी सुमधूर अशा शास्त्रोक्त वाणीमधून प्रवचन किर्तन सादर केले. या सोहळ्याला पंचक्रोशितील हजारो भाविक भक्तांनी उपस्थित राहून जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमन सोहळ्याचा लाभ घेतला यावेळी रामायणाचार्य हभप सोमनाथ महाराज गवळी, रंगनाथ महाराज, मंगलनाथ महाराज, दुगनाथ महाराज, पंढरीनाथ महाराज, गोपालनाथ महाराज, प्रशांत महाराज जाधव, पवन महाराज, शाम महाराज, धर्मनाथ महाराज, प्रशांत महाराज चौधरी, सुरेशराव केने, प्रभाकरराव महाले, नथ्थुभाऊ ठाकरे, रुद्रनाथ महाराज, ज्ञानेश्वर चौधरी, सुधिर महल्ले,सागर पाटील कडू, सरपंचा सौ सिमा बाबाराव सानप इत्यादी मंडळीची उपस्थिती होती. पुढे दि १३ मार्च रोजी १०:०० ते १२:०० वाजेपर्यत सिध्द सद्गुरु योगी शांतिनाथ महाराज यांचे गोपालकाल्याचे किर्तन होऊन महाआरतीनंतर दुपारी १:०० ते ४:०० पर्यंत पंचक्रोशितील भाविकांकरीता भव्य असा अन्नदान महाप्रसाद सोहळा होणार असून सायंकाळी ५ :०० ते रात्री ९:०० पर्यंत दिंडी सोहळा निघून नगर परिक्रमा होणार असल्याचे वृत्त कारंजा येथील महाराजांचे शिष्य राजीव भेंडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे.